
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीकडून या आर्थिक वर्षातील चौथ्या अंतरिम लाभांशावर विचार करण्याची अपडेट येताच शेअरने विक्रमी उच्चांक गाठला होता. यापूर्वी संचालक मंडळाची ऑक्टोबरमध्ये होणारी बैठक अनपेक्षित परिस्थितीमुळे ती रद्द करण्यात आली होती. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
वेदांता शेअरची सध्याची स्थिती
दरम्यान, सोमवारी वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअरने 526.95 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु होताच वेदांता शेअर 522 रुपयांवर खुला झाला होता आणि दिवसभरात 526.95 रुपयांचा उच्चांक स्तर गाठला होता. सोमवारी दिवसभरात शेअरने 510 रुपये हा निच्चांकी स्तर गाठला होता. सध्या वेदांता लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,00,759 कोटी रुपये आहे. सोमवारी बीएसईवर कंपनीच्या एकूण १.३७ लाख शेअर्सची उलाढाल झाली होती.
चार्टवर शेअर ‘ओव्हरबॉट’ झाल्याचे संकेत
वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये एक वर्षाचा बीटा १.३ आहे, जो या कालावधीत उच्च अस्थिरता दर्शवितो. टेक्निकल चार्टच्या बाबतीत वेदांता लिमिटेड कंपनीचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) ७४.२ इतका आहे, ज्यामुळे चार्टवर शेअर ‘ओव्हरबॉट’ झाल्याचे संकेत मिळत आहेत.
अंतरिम लाभांशावर विचार करणार
आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी इक्विटी शेअर्सवरील चौथ्या अंतरिम लाभांशावर विचार करून त्याला मंजुरी देण्यासाठी वेदांता लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक १६/१२/२०२४ रोजी होणार आहे, अशी माहिती कंपनीने स्टॉक मार्केटला दिली आहे. या लाभांशासाठी मंगळवार, २४ डिसेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे, असे वेदांता कंपनीने म्हटले आहे.
वेदांता लिमिटेड शेअरने 14,741 टक्के परतावा दिला
गेल्या ५ दिवसात या शेअरने 3.95% परतावा दिला आहे. गेल्या १ महिन्यात या शेअरने 14.75% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 13.53% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 96.97% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात शेअरने 255.98% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 99.69% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने गुंतवणूकदारांना 14,741.04% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.