
Vedanta Share Price | भारतातील अग्रणी खाण व्यवसाय करणारी वेदांता कंपनीबाबत नवीन माहिती आली आहे. वेदांता कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने वेदांता स्टॉक दोन वर्षांत दुप्पट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सोमवारी वेदांता स्टॉक 2.53 टक्क्यांच्या वाढीसह 465.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( वेदांता कंपनी अंश )
इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा स्टॉक 3.20 टक्क्यांच्या वाढीसह 468.55 रुपये किमतीवर पोहोचला होता. 2024 या वर्षात वेदांता स्टॉक 79 टक्क्यांनी वाढला आहे. आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी वेदांता स्टॉक 0.60 टक्के घसरणीसह 462.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. वेदांता कंपनीच्या प्रवर्तक संस्थांनी कंपनीतील आपला वाटा कमी केला आहे. मागील आठवड्यात अनेक प्रवर्तक संस्थांनी बँकांमार्फत आपला 2.6 टक्के वाटा खुल्या बाजारात विकून नफा वसुली केली आहे.
कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी माहिती दिली की, प्रवर्तकांचा वाटा 61.95 टक्क्यांच्या खाली आणण्याची कोणतीही योजना कंपनीने आखलेली नाही. मागील 18 महिन्यांत वेदांता कंपनीच्या प्रवर्तकांनी त्यांचा वाटा 10 टक्क्यांनी कमी केला आहे.
डिसेंबर 2022 मध्ये कंपनीच्या प्रवर्तकांचा वाटा 70 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. 28 सप्टेंबर 2023 रोजी वेदांता स्टॉक 207.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 22 मे 2024 रोजी हा स्टॉक 506.85 रुपये किमतीवर पोहचला होता. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतीवरून 9 टक्के खाली आला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.