 
						Vedanta Share Price | वेदांता कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज देखील हा स्टॉक विक्रीच्या दबावात क्लोज झाला आहे. या कंपनीने 26 जुलै रोजी रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक गुंतवणुकदारांना लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकतात. ( वेदांता कंपनी अंश )
जर 26 जुलै रोजी वेदांता कंपनीने लाभांश वाटप केला तर रेकॉर्ड तारीख 3 ऑगस्ट 2024 असू शकते. मंगळवारी वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या घसरणीसह 434.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.49 टक्के घसरणीसह 432.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
वेदांता कंपनीने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 94,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त लाभांश वाटप केला आहे. मे 2024 मध्ये या कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 11 रुपये लाभांश वाटप केला होता. मागील आठवड्यात या कंपनीने QIP च्या माध्यमातून भांडवल उभारणी केली आहे. यासह वेदांता कंपनीने मॉर्गन स्टॅनले, सोसायटी जनरल सारख्या संस्थांना आपले शेअर्स विकले आहेत.
ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलने आपल्या अहवालात माहिती दिली की, चांदी आणि तांब्यावरील शुल्क कमी केल्यामुळे हिंदुस्थान कॉपर आणि वेदांता कंपनीच्या नफ्यात कमजोरी येऊ शकते. नुकताच या कंपनीने कर्नाटक आणि बिहारमधील दोन महत्त्वाच्या खनिज ब्लॉकसाठी बोली लावली होती. त्यात कंपनीला यश मिळाले आहे. वेदांता कंपनीला गोलराहट्टी-मल्लेनाहल्ली निकेल क्रोमियम पीजीई ब्लॉक आणि जेंजाना निकेल, क्रोमियम पीजीई ब्लॉकचा ताबा देण्यात आला आहे. याबाबत कंपनीने सेबीला अपडेट कळवली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		