
Veerhealth Care Share Price | वीरहेल्थ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स मिळणार आहेत. नुकताच वीरहेल्थ केअर लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणुकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ही कंपनी गुंतवणुकदारांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे.
कंपनी आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स रिझर्व्हमधून वाटप करेल आणि हे सर्व शेअर्स पूर्ण पेड अप शेअर्स असतील. लवकरच कंपनी आपल्या शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर करेल. आज बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी वीरहेल्थ केअर कंपनीचे शेअर्स 42.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
चालू आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वीरहेल्थ केअर लिमिटेड कंपनीचे शेअर 42 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात वीरहेल्थ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 290 टक्के नफा कमावून दिला आहे.
जून 2023 तिमाहीमध्ये वीरहेल्थ केअर लिमिटेड कंपनीने 26 टक्क्यांच्या वाढीसह 3.58 कोटी रुपये निव्वळ विक्री साध्य केली आहे. जून तिमाहीमध्ये या कंपनीचा ऑपरेटिंग नफा 105 टक्क्यांच्या वाढीसह 0.43 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर कंपनीने जून तिमाहीत 277 टक्क्यांच्या वाढीसह 0.34 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 मधील वार्षिक आर्थिक निकालांनुसार वीरहेल्थ केअर लिमिटेड कंपनीने 38 टक्क्यांच्या वाढीसह 13.27 कोटी रुपये निव्वळ विक्री नोंदवली होती. तर संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीने ऑपरेटिंग नफ्यात 161 टक्क्यांच्या वाढ साध्य केली असून, कंपनीने 0.50 कोटी रुपये प्रॉफिट मिळवला आहे. कंपनीच्या वार्षिक निव्वळ नफ्यात 2,357 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आणि कंपनीने 1.58 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला.
वीरहेल्थ केअर लिमिटेड कंपनीने आपल्या व्यावसायिक विस्तार योजनेचा एक भाग म्हणून कॅसाब्लांका मोरोक्को येथे टूथपेस्टच्या “व्हिडंट” श्रेणीचा पुरवठा करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. वीरहेल्थ केअर लिमिटेड कंपनीने यापूर्वी पूर्व आफ्रिकन देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्टचे उत्पादन आणि निर्यात संबंधित व्यापारी कामकाज देखील केले आहे. यासर्व कामगिरीमुळे वीरहेल्थ केअर लिमिटेड कंपनीच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.