
Venus Pipes & Tubes Share Price | 2022 या वर्षात अनेक कंपन्याचे IPO बाजारात आले. अनेक IPO फ्लॉप गेले, तर काही IPO सुपरहिट झाले होते. असाच एक सुपरहिट झालेला IPO स्टॉक म्हणजे ‘व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स’. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत मग कमावून दिला आहे. व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सनी बीएसई आणि एनएसई इंडेक्सवर सूचीबद्ध झाल्यावर अवघ्या एका वर्षाच्या आत लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट केले आहे. व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग एकदम सपाट किमतीवर झाली होती. आता मात्र कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे, आणि शेअर्स लोकांना मजबूत कमाई देखील करून देत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Venus Pipes & Tubes Share Price | Venus Pipes & Tubes Stock Price | BSE 543528 | NSE VENUSPIPES)
7 महिन्यांत दुप्पट परतावा
व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचा IPO मे 2022 रोजी शेअर बाजारात खुला करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 310-326 रुपयांदरम्यान निश्चित केली होती. ज्या गुंतवणूकदारानी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना लिस्टिंगच्या दिवशी फक्त 3 टक्के नफा मिळाला होता. कारण या कंपनीचा IPO स्टॉक BSE इंडेक्समध्ये 335 रुपये आणि NSE इंडेक्समध्ये 337 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरची लिस्टिंग झाल्यावर शेअर्स खरेदी केले होते, त्यांना तर आगा दुप्पट परतावा मिळाला आहे. लिस्टिंगनंतर या स्टॉक मध्ये कमालीची तेजी आली होती.
मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्समध्ये 724.35 रुपये किमतीवर बंद झाले होते. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 725.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. याचा अर्थ गुंतवणूकदारांना लिस्टिंगपासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 115 टक्के नफा मिळवून दिला आहे. अपर प्राइस बँडपासून गणान केली तर हा परतावा 122 टक्के होईल. ऑक्टोबर 2022 मध्ये नुवामा फॉर्मने या कंपनीचा स्टॉकला ‘ बाय ‘ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. ब्रोकरेज फर्मने 2 महिन्यांसाठी 826 रुपये टार्गेट किंमत जाहीर केली होती.
तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, सध्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे, आणि ही तेजी पुढील काळात ही कायम राहण्याची शक्यता आहे. शेअर इंडिया फर्मचे तज्ञ म्हणतात की, ” दैनिक आणि साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर व्हीनस पाईप्स कंपनीचे शेअर्स अतिशय आकर्षक किमतीवर व्यापार करताना दिसत आहेत. सध्याही तेजी कायम राहिली तर स्टॉक पुढील काळात 790-850 रुपयांवर जाऊ शकतो”.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.