1 May 2025 8:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Venus Remedies Share Price | व्हीनस रेमेडीज शेअरमध्ये तेजी, स्टॉक वाढीचे कारण काय? फायदा घेण्यासाठी डिटेल्स वाचा

Venus Remedies Share Price

Venus Remedies Share Price | एकीकडे शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार असताना, दुसरीकडे व्हीनस रेमेडीज कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. व्हीनस रेमेडीज या फार्मा कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 248.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये वाढ, एका बातमीमुळे पाहायला मिळाली आहे. (Venus Share Price)

व्हीनस रेमेडीज कंपनीला स्पेनमध्ये त्वचा आणि पोटाच्या संसर्गावर वापरल्या जाणाऱ्या मेरोपेनेम या औषधाच्या मार्केटिंगची मंजुरी देण्यात आली आहे. मेरोपेनेम हे सर्वात जास्त विकले जाणारे जेनेरिक औषध आहे. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर 1.07 टक्के वाढीसह 254.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Venus Pharma GmbH या व्हीनस रेमेडीज कंपनीच्या जर्मन उपकंपनीला प्रतिजैविकांच्या 500mg, 1g आणि 2g इंजेक्शन्सचे मार्केटिंग करण्यासाठी ही मान्यता देण्यात आली आहे. व्हीनस रेमेडीज ही फार्मा कंपनी मागील तीन वर्षात भारतातून मेरोपेनेम औषधाची निर्यात करणारी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. डिसेंबर 2022 मध्ये उत्पादन लाँच करण्याच्या योजनांसह व्हीनस रेमेडीज कंपनी स्पेनमधील 6.34 दशलक्ष डॉलर्सच्या मेरोपेनेम मार्केटमधील 10 टक्के वाटा काबीज करण्याचा प्रयत्न करेल.

व्हीनस रेमेडीज कंपनीचे ग्लोबल क्रिटिकल केअरच्या अध्यक्षानी माहिती दिली की, व्हीनस रेमेडीज कंपनी या नवीन डीलमुळे युरोपीय बाजारपेठेतही आपले स्थान मजबूत करण्यास सक्षम होईल. व्हीनस रेमेडीज कंपनीच्या एकूण विक्रीत मेरापेनेम औषधाचा वाटा 40 टक्के आहे. युरोपममध्ये या औषधाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे बाजार भांडवल 70.34 दशलक्ष डॉलर्स आहे. व्हीनस रेमेडीज कंपनीने मेरोपेनेम औषध स्वत:च्या ब्रँड नावा अंतर्गत युरोपियन बाजारपेठांमध्ये लाँच केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Venus Remedies Share Price today on 23 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Venus Remedies Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या