
Vikas Ecotech Share Price | मागील काही दिवसापासून विकास इकोटेक कंपनीचे शेअर अप्पर सर्किट हीट करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 7.4 टक्क्यांच्या वाढीसह 3.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत.
विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 520 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.35 रुपये होती. आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी विकास इकोटेक स्टॉक 9.33 टक्के वाढीसह 4.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील 5 दिवसात विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 10.29 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात आतापर्यंत विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 टक्के वाढली आहे. 3 एप्रिल 2020 रोजी विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 62 पैशांवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत शेअरची आता 500 टक्क्यांनी वाढली आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये, विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले होते की, कंपनीने प्लास्टिसायझर मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे 100 टक्के इक्विटी शेअर्स खरेदी केले आहे. या कंपनीचे एकूण बाजार मूल्य 27 कोटी रुपये होते. हे अधिग्रहण डिसेंबर 2023 च्या शेवटी पूर्ण होणार आहे.
विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन उत्पादने जोडून आणि विविध बाजारपेठात विस्तार करून व्यवसाय वाढवण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच कंपनीने प्लास्टिसायझर व्यवसाय करणारी कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विकास इकोटेक कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये अधिक भर पडणार आहे.
विकास ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मागील तीन दशकांपासून प्लास्टिसायझर्स क्षेत्रात व्यवसाय करत आहे. मागील 25 वर्षांपासून ही कंपनी भारतीय औद्योगिक क्षेत्रात आणि घरामध्ये प्लास्टिसायझर्स क्षेत्रात नवजलेला ब्रँड मानली जाते. ही कंपनी मुंबईजवळ दमण येथे आपला अत्याधुनिक उत्पादन सुविधा केंद्र चालवत आहे. हा कंपनीच्या या प्लांटमधून वार्षिक 12000 मेट्रिक टन प्लास्टिसायझर तयार केले जाते.
विकास ऑरगॅनिक लिमिटेड कंपनी मुख्यतः परफ्यूम कंपाऊंड, कॉस्मेटिक, टॉयलेट अगरबत्ती, फार्मा, लेदर क्लॉथ, विनाइल फ्लोअरिंग, पीव्हीसी आणि रबर फुटवेअर, केबल, पीव्हीसी, फिल्म सीट, लवचिक पाईप, पेंट, सेफ्टी ग्लास, पेपर कोटिंग, अॅडहेसिव्ह आणि पेस्टिसाइड या सारख्या वस्तू उत्पादन करण्याचा व्यवसाय करते.
विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने आपल्या निवेदनात जाहीर केले होते की, कंपनीने आपले सर्व कर्ज परतफेड करण्याची करण्याची महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत कंपनीने आपले 5 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहे. कंपनीच्या मते, 31 मार्च 2024 पर्यंत विकास इकोटेक कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त होईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.