
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 5 रुपयेच्या खाली ट्रेड करत आहेत. शुक्रवारी हा स्टॉक सकाळी 3.05 रुपये किमतीवर ओपन झाला होता, मात्र काही वेळात शेअर 3.20 रुपये किमतीवर पोहोचला. इंट्राडेमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
विकास इकोटेक कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीला 20 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे. विकास इकोटेक या स्मॉलकॅप कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, प्रिझम जॉन्सन लिमिटेड कंपनीला कोळसा पुरवठा करण्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के वाढीसह 3.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्रिझम जॉन्सन लिमिटेड ही कंपनी राजन रहेजा ग्रुपने प्रमोट केलेल्या प्रतिष्ठित सिमेंट उत्पादक कंपन्यापैकी एक मानली जाते. विकास इकोटेक कंपनीला त्यांची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 20 कोटी रुपये आहे. विकास इकोटेक लिमिटेड ही कंपनी भारतात पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांसह अक्षय ऊर्जा आणि हरित ऊर्जा क्षेत्रांमध्ये व्यावसाय संधी शोधत आहे. विकास इकोटेक कंपनी नवी दिल्लीया ठिकाणी प्लास्टिक आणि रबर उद्योगांसाठी विशेष पॉलिमर आणि विशेष अडिटीव्ह आणि रसायने उत्पादनाचा व्यवसाय करते.
विकास इकोटेक ही स्मॉलकॅप कंपनी कृषी, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, इलेक्ट्रिकल, फुटवेअर, फार्मास्युटिकल्स, ऑटोमोटिव्ह, वैद्यकीय उपकरणे आपल्या ग्राहकांना पुरवण्याचे काम करते. विकास इकोटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 355 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4.15 प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2.35 रुपये प्रति शेअर होती. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांचा 76.32 टक्के तोटा केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.