 
						Vikas Ecotech Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये 4.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी कोमट स्पर्श केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 3.87 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी विकास इकोटेक शेअर्स 2.17% वाढीसह (NSE सकाळी 09:30 वाजता) 4.70 रुपयांवर ट्रेड करत होता. मात्र काही मिनिटातच (सकाळी ०९:४१ वाजता) हा शेअर तब्बल 6.52% घसरणीसह 4.30 रुपयांवर ट्रेड करत आहे.
मागील 2 दिवसात विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 39 टक्के परतावा कमवून दिला आहे. विकास इकोटेक कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2.38 रुपये होती. विकास इकोटेक ही स्मॉलकॅप कंपनी विशेष रसायने बनवण्याच्या उद्योगात गुंतलेली आहे.
विकास इकोटेक कंपनीने मार्च 2024 पर्यंत संपूर्ण कर्जमुक्त होण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. विकास इकोटेकने नुकताच जाहीर केले आहे की कंपनीने त्याच्या पूर्व निर्धारित कर्जमुक्तीच्या कार्यक्रमांतर्गत बँकर्सना 5 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहे. विकास इकोटेक कंपनीने 31 मार्च 2014 पर्यंत पूर्ण कंपनी कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 481 कोटी रुपये आहे.
मागील एका महिन्यात विकास इकोटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. आतापर्यंत कंपनीने आपले 66 टक्के कर्ज परतफेड केले आहे. या कंपनीच्या कर्जमुक्ती कार्यक्रमाचा पहिला टप्पा ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये सुरू झाला होता. विकास इकोटेक कंपनीने आपल्या करजदात्या बँकर्सना 105.2 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहे.
या कंपनीवर एकूण 161.2 कोटी रुपये कर्ज होते. आता फक्त 55 कोटी रुपये कर्ज बाकी आहे. या कंपनीने अवघ्या 2 वर्षात आपले 66 टक्के कर्ज परतफेड केले आहे. विकास इकोटेक कंपनीचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक विकास गर्ग यांना कंपनीच्या संचालक मंडळाने 10 कोटी रुपये मूल्याचे अनिवार्य परिवर्तनीय वॉरंट जारी केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		