 
						Vikas Lifecare Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी सेन्सेक्स निर्देशांक 74636 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी निर्देशांक 117 अंकांवर ट्रेड करत होता. ( विकास लाइफकेअर कंपनी अंश )
सोमवारी तेजीत वाढणाऱ्या शेअरमध्ये आयशर मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा, एसबीआय लाइफ, टाटा कंझ्युमर, दिवीज लॅब आणि श्रीराम फायनान्स या कंपनीचे शेअर्स सामील होते. तर विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या शेअरमध्ये अदानी पोर्ट्स, अपोलो हॉस्पिटल्स, नेस्ले इंडिया, विप्रो, एलटीआय माइंडट्री, ब्रिटानिया आणि एचडीएफसी या कंपन्यांचे शेअर्स सामील होते.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये एक टक्क्याची घसरण पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स सोमवारी 5.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 875 कोटी रुपये आहे.
विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी विकास लाइफकेअर स्टॉक 0.94 टक्के घसरणीसह 5.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
विकास लाइफकेअर कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीने अनेक गुंतवणूकदारांना वॉरंट वाटप केले आहेत. आणि 3.5 कोटी वॉरंट इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित केले गेले आहेत. आता कंपनीच्या संचालक मंडळाने 5.2 कोटी वॉरंटचे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. विकास लाइफकेअर कंपनीने सार्वजनिक श्रेणीतील गुंतवणूकदारांना हे वॉरंट 4 रुपये किमतीवर जारी केले आहे. यासह श्रेष्ठ फिनव्हेस्ट लिमिटेड कंपनीला 5.2 कोटी वॉरंट जारी करण्यात आले होते, ज्याचे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
विकास लाइफकेअर कंपनीला वॉरंटच्या रुपांतरणातून 15.6 कोटी रुपये निधी मिळणार आहे. या वॉरंट्सच्या रुपांतरणासाठी वाटपकर्त्यांकडून प्रति वॉरंट 3 रुपये दराने शिल्लक पेमेंट घेतली जाणार आहे. यातून विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीला 15.6 कोटी रुपये भांडवल मिळणार आहेत. यामुळे कंपनीचे पेड अप कॅपिटल 170.21 कोटी रुपये होईल. विकास लाइफ केअर लिमिटेड ही कंपनी मुख्यतः पॉलिमर आणि रबर कंपाऊंड्स बनवण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		