
Vishnu Chemical Share Price | जेव्हा एखादा गुंतवणूकदार शेअर बाजारात दीर्घ कालीन दृष्टीकोन ठेवून पैसे लावतो, तेव्हा त्याला बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट, डिव्हिडंड इत्यादींचा सर्व गोष्टींचा लाभ मिळतो. असाच लाभ विष्णू केमिकल्स कंपनी आपल्या शेअर धारकांना देणार आहे. या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना स्टॉक स्प्लिटचा लाभ देण्याची घोषणा केली होती, आणि शेअर्स शुक्रवारी दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी एक्स-स्प्लिट डेटवर ट्रेड करत होते. कंपनीने आपले शेअर्स 5 तुकड्यामध्ये विभाजन करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vishnu Chemicals Share Price | Vishnu Chemicals Stock Price | BSE 516072 | NSE VISHNU)
संचालक मंडळाचे स्पष्टीकरण :
विष्णू केमिकल कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने आपले विद्यमान शेअर 5 तुकड्यामध्ये विभाजन करण्यास मजुरी दिली आहे. स्टॉक स्प्लिट केल्यावर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरची किंमत 2 रुपये होईल. कंपनीने स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट 13 जानेवारी 2023 रोजी निश्चित केली होती. कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा 14 डिसेंबर 2022 रोजी जाहीर केली होती. ही कंपनी T+1 सेटलमेंट श्रेणीमध्ये असल्याने स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख आणि एक्स डेट 13 जानेवारी 2023 या एकाच दिवशी असेल.
विष्णू केमिकल कंपनीचे शेअर्स एनएसई इंडेक्सवर शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी 1.87 टक्के वाढीसह 302.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. विष्णू केमिकल्स कंपनीच्या गुंतवणूकदारांना मागील एक महिना थोडा निराशाजनक राहिला होता. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 2 टक्क्यांनी वाढली होती. मागील 6 महिन्यांत विष्णू केमिकल्स कंपनीच्या शेअरची किंमत 4.55 टक्के वाधरली होती. तर मागील एका वर्षात विष्णू केमिकल कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 62.13 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2170 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक परकी किंमत 916 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.