
Vodafone Idea Share Price | भारतीय स्पर्धा आयोगाने अॅटलस 2022 होल्डिंग्सला व्होडाफोन कंपनीच्या पीएलसीमधील गुंतवणूक वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याची माहिती जाहीर केली आहे. स्पर्धा आयोगाने व्होडाफोन गृपमधील शेअर होल्डिंग 14.6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
या गुंतवणूक प्रस्तावानुसार, भाग भांडवल प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा कमी ठेवले जाईल. सीसीआयच्या म्हणण्यानुसार गुंतवणूक करून भाग भांडवल वाढवण्याची प्रक्रिया टप्प्या टप्प्यांत पूर्ण केली जाईल. आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.53 टक्के वाढीसह 13.25 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
अॅटलस 2022 होल्डिंग्स कंपनी Emirates Telecommunications Group Company PJSC ची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. अॅटलस होल्डिंग कंपनीची स्थापना 24 फेब्रुवारी 2022 रोजी झाली होती. या कंपनीने व्होडाफोन गृपमधील 14.6 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. एमिरेट्स टेलिकम्युनिकेशन ग्रुप कंपनीचे मुख्यालय अबुधाबी याठिकाणी स्थित आहे. ही कंपनी मध्य पूर्व, आशिया आणि आफ्रिकेतील विविध देशांमध्ये व्यवसाय करते.
या दोन्ही कंपनीची भारतात उपकंपनी नाही किंवा या दोन्ही कंपनीकडे भारतात कोणताही मोबाइल नेटवर्क ऑपरेटर परवाना देखील नाहीये. तर दुसरीकडे, व्होडाफोन ग्रुप पीएलसी ही एक ब्रिटिश कंपनी म्हणून ओळखली जाते. भारतात या कंपनीची उपकंपनी Vodafone Idea Limited दूरसंचार सेवा प्रदान करण्याचे करु करते.
व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनपासून तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावातून सावरले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 महिन्यांत व्होडाफोन आयडिया स्टॉक 48 टक्के मजबूत झाला आहे. 2023 या वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 64 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.