
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 1.35 टक्क्यांच्या वाढीसह 15.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवारी ओपनिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना आश्चर्यचकित करून टाकले. या स्टॉकची ओपनिंग अप्पर सर्किटसह झाली होती. मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17.58 टक्के परतावा कमावून दिला आहे.
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स एका वर्षभरात 24 रुपयेपर्यंत वाढू शकतात. शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 5.33 टक्के वाढीसह 15.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉक खरेदी करताना 12 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
मार्च 2024 अखेर संपलेल्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीला 7,674.6 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. तर डिसेंबर 2023 मध्ये या कंपनीला 6986 रुपये तोटा सहन करावा लागला होता. व्होडाफोन आयडिया कंपनीचे उत्पन्न तिमाही-दर-तिमाही आधारावर 10,673.1 कोटी रुपयेवरून कमी होऊन 10,606.8 कोटी रुपयेवर आले आहेत.
वार्षिक आधारावर या कंपनीचा तोटा 6,419 कोटी रुपयेवरून वाढून 7,674.6 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 10532 कोटी रुपयेवरून वाढून 10606.8 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.