
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्के वाढीसह 16.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये सकारात्मक बातमीमुळे भरघोस खरेदी सुरू आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक भांडवल उभारणीच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहेत.
कंपनीचे संचालक मंडळ राईट इश्यू, पब्लिक ऑफर, प्रेफरेंशियल ॲलोटमेंट, प्रायव्हेट प्लेसमेंट, पात्र संस्थात्मक प्लेसमेंट किंवा इतर माध्यमातून भांडवल उभारणी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक तेजी निर्माण झाली आहे. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 7.67 टक्के वाढीसह 17.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष, कुमार मंगलम बिर्ला यांनी आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्होडाफोन आयडिया कंपनीला संकटातून बाहेर काढण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. ते म्हणाले की, “गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. आम्ही नवीन गुंतवणुकदारांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र त्यासाठी कोणतीही टाइमलाइन देऊ शकत नाही”.
डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीला 6986 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. या काळात कंपनीची प्रति ग्राहक सरासरी कमाई किंचित सुधारली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीला 7,990 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स पुढील काळात 25 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 13.50 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून 25 रुपये टार्गेटसाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. मागील पाच महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे.
दैनिक टेक्निकल चार्टवर व्होडाफोन आयडिया स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 18.42 रुपये होती. तर निचांक किंमत पातळी 5.70 रुपये होती. व्होडाफोन आयडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 79,250.75 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.