
Voltas Share Price| टाटा समूहाचा भाग असलेल्या व्होल्टास कंपनीच्या शेअर्सबाबत तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होल्टास कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 1241.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 1350 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी व्होल्टास स्टॉक 0.62 टक्के वाढीसह 1,314.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( व्होल्टास कंपनी अंश )
ब्रोकरेज फर्मने व्होल्टास कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने व्होल्टास कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 1,250 रुपयेवरून वाढवून 1,350 रुपये केली आहे. HSBC फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, “आम्ही व्होल्टास कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहोत. हा स्टॉक पुढील काळात मजबूत तेजीत वाढू शकतो. म्हणून शेअर सध्या फोकसमध्ये आला आहे.”
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये व्होल्टास कंपनीने 35 टक्के वाढीसह 20 लाख युनिट्स एसी विक्रीचा टप्पा ओलांडला होता. व्होल्टास ही कंपनी एसी विक्रीचा हा टप्पा ओलांडणारी देशातील पहिली कंपनी ठरली आहे. सातत्यपूर्ण मागणी, मजबूत ऑफलाइन आणि ऑनलाइन वितरण नेटवर्क आणि नवोपक्रमावर आधारित नवीन उत्पादने लाँच केल्यामुळे कंपनीच्या विक्रीत वाढ पाहायला मिळाली आहे.
व्होल्टास कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, “कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 35 टक्क्यांच्या वाढीसह 20 लाखांपेक्षा जास्त एसीची विक्री केली आहे. ही भारतीय ब्रँडद्वारे एका आर्थिक वर्षात करण्यात आलेली आतापर्यंतची सर्वाधिक एसी विक्री आहे. भारतातील एअर कंडिशनिंग उद्योगात ऐतिहासिक कामगिरी करणारा व्होल्टास हा पहिला ब्रँड ठरला आहे”. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशातील एसी मार्केटचा आकार एक कोटी युनिट्स पेक्षा जास्त असण्याचा अंदाज होता. चालू आर्थिक वर्षात एसी युनिट्सचा आकडा 1.15 कोटी युनिटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.