14 May 2025 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL IREDA Share Price | 49 टक्के रिटर्न मिळेल, पीएसयू शेअर मालामाल करणार, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो या फंडात पैसे गुंतवा, 16 पटीने परतावा मिळतोय, करोडोत रिटर्न मिळेल Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON
x

Waaree Share Price | 8 रुपयाचा शेअर ठरला आयुष्य बदलणारा, 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर दिला 1.38 कोटी रुपये परतावा, स्टॉक डिटेल्स

Waaree Share Price

Waaree Share Price | वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 13,000 टक्के नफा कमावून दिला आहे. 3 जुलै 2020 रोजी या सौर पॅनेल बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स 8.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 4 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 1135.60 रुपयेवर पोहचला आहे. (Waaree Renewable Share Price)

वारी रिन्युएबल कंपनीच्या स्टॉकमध्ये तीन वर्षांपूर्वी 1 लाख रुपये लावणाऱ्या लोकांना 1.38 कोटी रुपये परतावा मिळाला आहे. 28 जून 2023 रोजी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1174.50 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 जुलै 2022 रोजी कंपनीच्या शेअरने 290.10 रुपये 52 आठवड्यांची नीचांक पातळी स्पर्श केली होती. आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 1,127.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये 2.56 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2363.73 कोटी रुपये होते. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या प्रवर्तकानी 74.51 टक्के शेअर्स धारण केले होते. तर 11,119 सार्वजनिक शेअर धारकांकडे 25.49 टक्के भाग भांडवल होते. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीचे 5.08 टक्के भाग भांडवल असलेल्या 22 शेअर धारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2 लाख रुपयांपेक्षा जास्त होते.

तांत्रिक दृष्टीने वारी रिन्युएबल कंपनीच्या शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 66.2 अंकावर आहे. हा वरून स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नसल्याची माहिती मिळते. वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी स्टॉकचा एक वर्षांचा बीटा 0.4 आहे. यावरून शेअरमधील कमी अस्थिरता पाहायला मिळते. वारी रिन्युएबल्स कंपनीचे शेअर्स 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवस, चा सरासरी किमतीवर ट्रेड करत आहेत. परंतु स्टॉक 5 दिवसांच्या सरासरी किमतीपेक्षा खाली ट्रेड करत आहेत.

मार्च 2023 च्या तिमाहीत वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी फर्मने 60.7 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 74.9 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2022 तिमाहीत वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीने 8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जो मार्च 2023 तिमाहीत दुप्पट वाढून 15.6 कोटीवर पोहचला आहे. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा 21.1 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 9.8 कोटी रुपये ऑपरेटिंग नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Waaree Share Price today on 06 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Waaree Renewable Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या