
WAPCOS IPO | येत्या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील अभियांत्रिकी सल्लागार कंपनी वापकोसचा आयपीओ लाँच करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (डीआयपीएएम) सचिव तुहीन कांत पांडे यांनी ही माहिती दिली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, WAPCOS Share Price | WAPCOS Stock Price)
सरकारचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय आहे?
तुहिन कांत पांडे यांनी एजन्सीशी विशेष संवाद साधताना सांगितले की, पुढील आर्थिक वर्षासाठी ५१,००० कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते म्हणाले की, ‘वापकोस’च्या आयपीओची मसुदा कागदपत्रे यापूर्वीच दाखल करण्यात आली आहेत.
‘वापकोस’च्या’च्या आयपीओने सेबीकडे सादर केली कागदपत्रे
दीपम सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सरकारचा हिस्सा सांभाळते. जलशक्ती मंत्रालयांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी सल्लागार आणि बांधकाम सेवा देणाऱ्या ‘वापकोस’ या कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपले ३.२५ कोटी शेअर्स सरकारला विकण्यासाठी एक मसुदा सादर केला होता. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीचे ऑपरेटिंग इनकम 2,798 कोटी रुपये आणि निव्वळ नफा 69.16 कोटी रुपये होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.