5 May 2025 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | 67 टक्के कमाईची संधी; या बातमीनंतर पेनी स्टॉकची जोरदार खरेदी सुरु - NSE: IDEA Adani Green Share Price | अप्पर सर्किट हिट, अदानी ग्रीन शेअरमध्ये तुफान तेजी, टार्गेट जाणून घ्या - NSE: ADANIGREEN Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
x

Welspun Corp Share Price | वेलस्पन कॉर्प शेअर्समध्ये तेजीचे संकेत, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, खरेदी करावा?

Welspun Corp Share Price

Welspun Corp Share Price | वेलस्पन कॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 595 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच East Pipes Integrated Company for Industry कंपनी या वेलस्पन कॉर्प लिमिटेड कंपनीच्या उपकंपनीला सौदी अरेबिया सरकारने 3,000 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे.

त्यामुळे गुरूवारी शेअर बाजार विक्रीच्या दबावात असताना देखील या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. आज शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी वेलस्पन कॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के घसरणीसह 596.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

वेलस्पन कॉर्प लिमिटेड कंपनीला स्टील पाईप्सचे उत्पादन करण्यासाठी आणि त्यांचा पुरवठा करण्यासाठी सॅलाईन वॉटर कन्व्हर्जन कॉर्पोरेशन कंपनीकडून 2,200 कोटी रुपये मूल्याची पहिली ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डरची पूर्तता पुढील 39 महिन्यांत पूर्ण केली जाईल.

सौदी अरेबिया ऑइल कंपनीकडून वेलस्पन कॉर्प लिमिटेड कंपनीला 339 कोटी रुपये मूल्याच्या स्टील पाईप्सची निर्मिती आणि त्यांचा पुरवठा करण्याची दुसरी ऑर्डर मिळाली आहे. पुढील आठ महिन्यांत या ऑर्डरची पूर्तता केली जाईल. आणि तिसत्या ऑर्डरचे मूल्य 170 कोटी रुपये आहे. या कंत्राट अंतर्गत अरामको कंपनीच्या स्टील पाईप्सची दुहेरी जोडणी आणि कोटिंगचे काम देण्यात आले आहे. ही ऑर्डर पुढील 20 महिन्यांत पूर्ण केली जाईल.

वेलस्पन कॉर्प लिमिटेड कंपनीने माहिती दिली की, या ऑर्डरचा आर्थिक फायदा कंपनीला आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीपासून ते आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाही दरम्यान मिळेल. EPIC ही कंपनी सौदी अरेबियामधील हेलिकल सबमर्ज्ड आर्क वेल्डेड पाईप्सची अग्रणी उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते.

मागील आठवड्यात, वेलस्पन ग्रुप कंपनीने गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात ग्रीन अमोनिया प्लांटची उभारणी करण्यासाठी 40,000 कोटी रुपयेची गुंतवणूक केली आहे. नुकताच वेलस्पन कंपनीने तेलंगणा राज्यात गुंतवणुकीची घोषणा केली आहे. तामिळनाडू ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीटमध्ये कंपनीने 6,000 कोटी रुपये गुंतवणुक करण्याची घोषणा केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Welspun Corp Share Price NSE Live 19 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Welspun Corp Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या