
Wendt India Share Price Today | ‘वेंड्ट इंडिया’ या स्मॉल कॅप कंपनीने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. यासोबतच कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांम अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही बातमी येताच कंपनीचे शेअर्स सुसाट वेगात धावू लागले आहे. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी ‘वेंड्ट इंडिया’ कंपनीचे शेअर्स 16.43 टक्के वाढीसह 9,188.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,785.67 कोटी रुपये आहे. (Wendt India Limited)
‘वेंड्ट इंडिया’ कंपनीच्या शेअरनी दुपारच्या ट्रेडिंग तासात 9360 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. आणि स्टॉक दिवसाअखेर 9188 रुपये किमतीवर बंद झाला होता. 7891 रुपये या मागील बंदच्या तुलनेत शेअरची किंमत 16.43 टक्के अधिक वाढली आहे.
500 टक्के लाभांश देण्याची घोषणा :
‘वेंड्ट इंडिया’ या कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर्स धारकांना अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चालू आर्थिक वर्षाच्या नफ्यातून 50 रुपये प्रति शेअर म्हणजेच 500 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. 18 जानेवारी 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात कंपनीने प्रति शेअर 30 रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला होता.
मार्च 2023 तिमाही निकाल :
‘वेंड्ट इंडिया’ कंपनीने मार्च 2023 मध्ये 60.66 कोटी रुपये कमाई केली होती. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 48.69 कोटी रुपये कमाई केली होती. या महसूल उत्पन्नात कंपनीने 12.79 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीचे EPS प्रमाण 63.96 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.