 
						Wipro Share Price | विप्रो या भारतातील दिग्गज आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये विप्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8.7 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. 2 जुलै 2024 रोजी विप्रो स्टॉक 545 रुपये किमतीवर पोहचला होता. दिवसाअखेर हा स्टॉक 2.06 टक्क्यांच्या वाढीसह 538.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी विप्रो स्टॉक 0.72 टक्के घसरणीसह 531.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( विप्रो कंपनी अंश )
ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरच्या तज्ञांनी विप्रो कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. विप्रो कंपनीचे शेअर्स 739 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीवरून खाली आले होते. मात्र आता या स्टॉकने 460 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. ब्रोकरेज फर्मनुसार विप्रो स्टॉक पुढील काळात 550 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरच्या तज्ञांच्या मते, वाढत्या ट्रेडिंग व्हॉल्यूममुळे आणि वाढत्या आरएसआयमुळे विप्रो स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रोकरेज फर्मने विप्रो स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 440 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. विप्रो स्टॉकची दीर्घकालीन टारगेट प्राइस 735-850 रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		