 
						Wipro Share Price | विप्रो या भारतातील दिग्गज आयटी कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते.
तज्ञांनी स्टॉक विक्रीच्या दबावात असताना खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विप्रो कंपनीचे शेअर्स 468 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी विप्रो स्टॉक 0.20 टक्के वाढीसह 471.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
विप्रो कंपनीचे शेअर्स 22 नोव्हेंबर 2023 रोजी 400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 22 डिसेंबर रोजी या कंपनीच्या शेअरने 462 रुपये किंमत स्पर्श केली होती. मागील एका महिन्यात विप्रो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात विप्रो स्टॉक 8 टक्क्यांनी मजबूत झाला होता.
मागील 3 महिन्यांत विप्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे. विप्रो कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 475 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 352 रुपये होती.
तज्ञांच्या मते, फेडरल बँक ऑफ अमेरिकाने आयोजित केलेल्या बैठकीनंतर, निफ्टी आयटी निर्देशांकात तेजी पाहायला मिळाली होती. पुढील काही महिने आयटी स्टॉकमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळू शकते. सध्या विप्रो स्टॉक 445 रुपये किमतीच्या आसपास प्रतिरोध निर्माण करत आहे. तज्ञांच्या मते, विप्रो स्टॉकमध्ये हळूहळू व्हॉल्यूम वाढ होत आहे. आरएसआय ऑसिलेटरमध्ये विप्रो स्टॉकमध्ये तेजीचे संकेत मिळत आहे.
तज्ञांनी विप्रो स्टॉक घसरणीसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी विप्रो कंपनीच्या स्टॉकवर 484 ते 495 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. आणि गुंतवणूक करताना तज्ञांनी 440 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		