
Wipro Share Price Today | देशातील दिग्गज आयटी कंपनी ‘विप्रो लिमिटेड’ बाय बॅक करण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बायबॅक प्रस्तावावर विचार केला जाऊ शकतो. 26 आणि 27 एप्रिल रोजी देखील कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विप्रो कंपनीने जानेवारी 2021 मध्ये देखील बायबॅक अंतर्गत शेअर खरेदी केले होते. तेव्हा कंपनीच्या बायबॅकचा आकार 9500 कोटी रुपये होता, ज्यात 400 रुपये प्रति शेअर दराने शेअर्स खरेदी करण्यात आले होते. (Wipro Limited)
27 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बायबॅक व्यतिरिक्त मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीच्या निकालांवरही चर्चा केली जाणार आहे. 27 एप्रिल 2023 रोजी कंपनी आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. आज मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के घसरणीसह 375.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एक वर्षभरापूर्वी भारतातील दिग्गज आयटी कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ ने ही 18,000 कोटी रुपये मूल्याची बायबॅक प्रक्रिया पूर्ण केली होती. याशिवाय इन्फोसिस कंपनीने या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये 9300 कोटी रुपये मूल्याची बायबॅक प्रक्रिया पूर्ण केली होती. विप्रोने बायबॅकची घोषणा केल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळू शकतो. मागील बऱ्याच कालपासून विप्रो कंपनीचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले आहेत.
मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विप्रो कंपनीच्या निव्वळ नफ्यात फक्त 2.8 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. कंपनीने 3053 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी कंपनीने 2969 कोटी रुपयांचा नफा कमावला होता, तर डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या महसुल संकलनात 14.3 टक्के वाढ पाहायला मिळाली होती.
मागील एक वर्षापासून आयटी कंपन्यांचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. अमेरिका आणि युरोपमधील वाढत्या महागाईचा आयटी क्षेत्रावर अतिशय विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे टीसीएस आणि इन्फोसिससारख्या आयटी कंपन्यांनी डिसेंबर तिमाहीमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. मात्र आता सर्वांचे लक्ष विप्रो कंपनीच्या मार्च 2023 तिमाहीच्या निकालाकडे लागले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.