15 May 2025 9:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Waiting Ticket | वेटिंग तिकीट रेल्वे प्रवाशांनो, नवीन नियम लागू, ट्रेनमध्ये सीट विसरावी लागेल, अपडेट लक्षात घ्या ITR Filing 2025 | नोकरदारांनो, ITR फाइल करताना या चुका टाळा, अन्यथा मोठा त्रास होऊन आर्थिक नुकसान होईल EPFO Money Amount | पगारदारांनो सॅलरीतून EPF कट होत असल्यास खात्यात जमा होणार 1,30,35,058 रुपये, फायद्याची अपडेट CDSL Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने घटवली रेटिंग, शेअरची टार्गेट प्राईस सुद्धा अपडेट केली - NSE: CDSL RVNL Share Price | मल्टीबैगर शेअरमध्ये तेजीचे संकेत, अपसाइड टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RVNL IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK
x

Yes Bank Share Price | धाकधूक वाढली? येस बँक शेअर्स आणखी स्वस्त होणार? स्टॉक अपडेट्स जाणून घ्या

Yes bank Share Price

Yes bank Share Price | 3 वर्षांपूर्वी ‘येस बँक’ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती, तेव्हा भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने म्हणजेच ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ ने आणि 8 इतर बँकानी 10000 कोटी रुपये गुंतवून येस बँक वाचवली. या निधीमुळे येस बँकेचा व्यवसाय रुळावर आला आणि येस बँकेच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त वाढ झाली. मागील 1 वर्षात येस बँकेचे शेअर्स 30.98 टक्के वाढले आहेत. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी येस बँक शेअर 1.18 टक्के घसरणीसह 16.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

एसबीआयची गुंतवणूक :
येस बँकेच्या शेअर्समधील वाढीमुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट झाले आहे. स्टेट बँकेचे येस बँकमधील भाग भांडवल मागील तीन वर्षांत दुप्पट झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने 14 मार्च 2020 रोजी खाजगी क्षेत्रातील येस बँकेचे 30 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. येस बँकेने मागील तिमाहीत कार्लाइल ग्रुप आणि अॅडव्हेंट इंटरनॅशनल या खाजगी इक्विटी कंपन्यांना शेअर्स जारी केल्यानंतर SBI कडे 26 टक्के भाग भांडवल उरले.

SBI चे गुंतवणूक मूल्य :
SBI बँकेने येस बँकेत गुंतवलेल्या रकमेचे मूल्य आता 12655 कोटी रुपये झाले आहे. सध्याच्या बाजारभावानुसार SBI कडे येस बँकेचे 26.14 टक्के भाग भांडवल आहे. त्याचे एकूण मूल्य 12655 कोटी रुपये आहे. आठ बँकानी निधी गुंतवल्यानंतर येस बँकेच्या शेअर्समध्ये जवळपास 70 टक्के वाढ झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, फेडरल बँक, बंधन बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, यांनी येस बँकेत मोठी गुंतवणूक केली होती.

3 वर्षांचा लॉक इन कालावधी :
येस बँकेत पैसे लावणाऱ्या कर्जदारांचा 3 वर्षांचा लॉक इन कालावधी 13 मार्च 2023 रोजी संपणार आहे. एसबीआयसह इतर काही कर्जदाते येस बँकेतील आपले शेअर्स विकू शकतात अशा चर्चांना उधाण आले आहे. डिसेंबर 2022 च्या अखेरीस बंधन बँक वगळता इतर कर्जदारांकडे येस बँकेत एकत्रित 36.12 टक्के भाग भांडवल होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : YES Bank Share Price 532648 YESBANK stock market live on 08 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या