
Yes Bank Share Price | शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी येस बँक लिमिटेड शेअर 1.19 टक्क्यांनी घसरून 18.25 रुपयांवर पोहोचला होता. येस बँक लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप सध्या 57,184 कोटी रुपये आहे. येस बँक लिमिटेड शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 32.85 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 17.06 रुपये होती.
येस बँक शेअरची ट्रेडिंग रेंज
15 जुलै 2005 रोजी येस बँक लिमिटेड शेअर 12.37 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या येस बँक लिमिटेड शेअर 18.25 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची गुरुवारची बंद किंमत 18.47 रुपये होती. शुक्रवारी दिवसभरात हा शेअर 18.15 रुपये ते 18.63 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला
टेक्निकल चार्टवर येस बँक खूप नकारात्मक संकेत देत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. येस बँक शेअर सातत्याने खाल पातळीवर घसरत आहे, जो मजबूत मंदीचे संकेत देत आहे. सध्याच्या पॅटर्ननुसार शेअरमध्ये सातत्याने विक्रीचा दबाव आहे. तसेच हा शेअर खरेदीदारांसाठी आकर्षक राहिलेला नाही.
टेक्निकल चार्टनुसार एडीएक्स सुद्धा नकारात्मक क्रॉसओव्हर दर्शवितो आहे. त्यामुळे शेअरमध्ये घसरणीचा कल मजबूत असल्याचे संकेत दिसत आहेत. परिणामी पुढे देखील शेअर्समध्ये घसरण सुरु राहण्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे सध्याच्या पातळीवर येस बँक शेअर्स खरेदी न करण्याच्या सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. जोपर्यंत येस बँक शेअरमध्ये ट्रेंड रिव्हर्सल किंवा मोमेंटममध्ये सुधारणा होण्याची स्पष्ट संकेत दिसत नाहीत तोपर्यंत गुंतवणूकदारांनी लाँग पोझिशन घेणे टाळावे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
येस बँक शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात येस बँक शेअर 1.08% घसरला आहे. मागील १ महिन्यात येस बँक शेअर 7.83% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 26.71% घसरला आहे. मागील १ वर्षात येस बँक शेअर 26.11 टक्के घसरला आहे. गेल्या ५ वर्षात हा शेअर 57.36 टक्के घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 47.53 टक्के परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर येस बँक शेअर 7.03% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.