2 May 2025 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Yes Bank Share Price | SBI च्या नियंत्रणाखाली आल्याने येस बँकेचे कामकाज सुधारले, पण शेअरमधील पडझड थांबणार की तेजी येणार?

Yes Bank Share price

Yes Bank Share Price | येस बँकेचे व्यवस्थापन जेव्हापासून स्टेट बँक ऑफ इंडिया या भारतातील सर्वात मोठ्या बँकेच्या ताब्यात आले आहेत, तेव्हापासून येस बँक उत्तम कामगिरी करत आहे. येस बँकेच्या शेअर्सनी 14 डिसेंबर 2022 रोजी NSE इंडेक्सवर 24.75 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवरून शेअर घसरल्यानंतर 16 जानेवारी 2023 रोजी 20.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात शेअरची किंमत आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 20 टक्क्यांनी खाली आली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, स्टॉक मार्च 2023 पर्यंत अस्थिर राहू शकतो, कारण IDFC फर्स्ट बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक या प्रमुख बँकांचा लॉक-इन पूर्ण होत आहे. त्यामुळे हे सर्व बँकिंग स्टॉक पुढील काळात अस्थिर राहू शकतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

अर्थ मंत्रालयाचे सहाय्य :
येस बँकेच्या शेअरची किंमत मागील तीन वर्षांत दुप्पट झाली आहे. आता या बँकिंग स्टॉकचा लॉक-इन कालावधी संपत आला आहे, म्हणून स्टॉकमध्ये बँका मार्च 2023 पर्यंत प्रॉफिट बुकींग पाहायला मिळू शकते. स्टॉक मार्केट तज्ञांच्या मते, येस बँक मध्ये अंशतः प्रॉफिट बुकींग होऊ शकते. याशिवाय स्टॉक मार्कट तज्ज्ञांनी माहिती दिली आहे की, केंद्रीय वित्त मंत्रालय येस बँकेसह अनेक बँकांना बुडीत कर्जाचा सामना करण्यासाठी अर्थ सहाय्य देणार आहे.

येस बँक शेअरची लक्ष किंमत :
येस बँक शेअर ओव्हर सोल्ड झाले आहेत. त्यामुळे शेअर लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक शेअर 19.65 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर क्लोज झाला होता. तज्ञांनी येस बँक शेअर पुढील काळात 28 रुपयांपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच वेळी, येस बँक साठी तज्ञांनी मध्यावधी लक्ष किंमत 36 रुपये आणि दीर्घ कालीन लक्ष किंमत 44 रुपये निश्चित केली आहे. तज्ज्ञांनी गुंतवणूक करताना 17 रुपयेवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. डिसेंबर 2022 मध्ये येस बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. यावर GCL सिक्युरिटीजचे तज्ञ म्हणाले, की “किरकोळ गुंतवणूकदारांनी येस बँकेचे शेअर्स होल्ड करून ठेवले आहेत, मात्र शेअर सध्या ओव्हर सोल्ड झाला आहे. त्यामुळे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवरीन खाली आले आहेत.

तज्ञांचे येस बँक स्टॉकबाबत मत : जीसीएल सिक्युरिटीजचे तज्ञ म्हणाले की, येस बँक जेव्हापासून एसबीआय बँकेच्या नियंत्रणाखाली आली आहे, तेव्हापासून येस बँकेच्या मूलभूत गोष्टींमध्ये झपाट्याने सुधारणा पाहायला मिळत आहे. येस बँकेचे तिसऱ्या तिमाहीतील निकाल देखील जबरदस्त आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाही निकालात येस बँकच्या NPA मध्ये सुधारणा पाहायला मिळाली आहे. एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या म्हंटले आहे की, येस बँक शेअर मधील घसरणी मुळे घाबरून झाल्याची गरज नाही. स्टॉक लॉक-इन कालावधी संपला असल्याने शेअरमध्ये पडझड सुरू आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : YES Bank Share Price in focus 532648 YESBANK check details on 16 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या