 
						Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये शुक्रवारच्या (२७ ऑक्टोबर) व्यवहारात उसळी पाहायला मिळाली असून हा शेअर 0.63 टक्के वाढीसह 16 रुपयाच्या पातळीवर बंद झाला. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सुभाष चंद्रा आणि बँकेच्या मालमत्ता पुनर्रचना युनिटमध्ये थकित कर्जाबाबत समझोता झाल्याच्या वृत्तानंतर सप्टेंबर महिन्यात देखील शेअरच्या किंमतीत वाढ झाली होती.
त्या बातमींनंतर शेअरमध्ये उच्च व्हॉल्यूमसह जोरदार उसळी दिसून आली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला शेअरने 17.34 रुपयांची पातळी गाठली होती, त्यावेळी हा शेअर लवकरच २० ची पातळी ओलांडू शकतो, असे बाजार तज्ज्ञांचे मत होते. पण ऑक्टोबरमध्ये इस्राईल आणि पॅलेस्टाईन युद्ध उफाळून आलं आणि भारतासह जागतिक आर्थिक पडझड पाहायला मिळाली आहे.
सप्टेंबर ते ऑक्टोबर शेअरच्या किंमतीचा प्रवास कसा आहे?
सप्टेंबरच्या सुरुवातीला (१ सप्टेंबर शुक्रवार) व्यवहाराच्या सुरुवातीलाच शेअरमध्ये दबाव होता. मात्र, सुभाष चंद्रा आणि बँकेच्या मालमत्ता पुनर्रचना युनिटमध्ये थकित कर्जाबाबत सकारात्मक बातमी येताच शेअरमध्ये जोरदार उसळी दिसून आली होती आणि त्यादिवशी हा शेअर १६.७२ च्या दिवसाच्या नीचांकी पातळीवरून १७.५८ पर्यंत वाढला होता. म्हणजेच ट्रेडिंग दरम्यान शेअरमध्ये सर्वाधिक 5 टक्क्यांहून अधिक रिकव्हरी दिसून आली होती. याचबरोबर शेअरमधील वॉल्यूममध्येही झपाट्याने वाढ झाली होती. दुसरीकडे, ऑक्टोबरच्या शेवटच्या शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) शेअर 0.63 टक्के वाढीसह 16 रुपयाच्या पातळीवर बंद झाला आहे.
सकारात्मक बातमीचा पुढेही शेअरला फायदा होणार?
सुभाष चंद्रा आणि येस बँकेचे मालमत्ता पुनर्रचना युनिट असलेल्या जेसी फ्लॉवर अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यातील कराराला बाजारातून अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या करारानुसार सुभाष चंद्रा यांनी अटींसह थकीत कर्जाची परतफेड करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेले हे प्रकरण आता संपुष्टात आले आहे.
शेअरबाबत तज्ज्ञांचा पुढील अंदाज काय.. टार्गेट प्राईस?
तांत्रिक चार्टच्या आधारे हा शेअर आणखी वाढण्याची शक्यता प्रभूदास लीलाधर यांच्या विश्लेषकाने व्यक्त केली आहे. अल्पावधीत, प्रतिकार 18.55 च्या पातळीच्या जवळ राहतो. ही पातळी तुटली तर शेअरमध्ये आणखी २१ ते २२ रुपयाच्या पातळीवर दिसू शकतो. तर अल्पावधीत या शेअरला १६.७ च्या पातळीवर सपोर्ट मिळत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		