
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्सबाबत एक चिंताजनक अपडेट आली आहे. ही बातमी गुंतवणूकदारांना किंचित निराश करू शकते. नुकताच जेएम फायनान्शिअल फर्मने येस बँकेच्या शेअर्सवर ‘डाउनग्रेड’ रेटिंग जाहीर केली आहे. येस बँकेने आपल्या उच्च कर्ज वसुली, स्थिर मार्जिन आणि स्थिर वाढीमुळे मार्च तिमाहीत मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा केली आहे. ( येस बँक अंश )
तज्ञांच्या मते, येस बँकेचे मार्च 2024 तिमाहीचे निकाल सकारात्मक असले तरी तज्ञांनी केलेले बँकेचे स्टॉक मूल्यांकन चिंतेची गोष्ट आहे. तज्ञांनी येस बँकेच्या शेअर्सवर ‘सेल’ रेटिंग देऊन बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक पुढील काळात 32 टक्के घसरू शकतो. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी येस बँक स्टॉक 3.51 टक्के घसरणीसह 26.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
जेएम फायनान्शियल फर्मने येस बँक स्टॉकची टारगेट प्राइस कमी करून 18 रुपये निश्चित केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी घसरेल. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने देखील येस बँक स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग जाहीर केली आहे. कोटकने येस बँक स्टॉकसाठी 19 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.
येस बँकेने मार्च 2024 तिमाहीत ओपेक्स उच्च असताना मजबूत कर्ज वसुली नोंदवली होती. येस बँकेच्या इतर उत्पन्नामध्ये शुल्क उत्पन्न वाढीमुळे भर पडली आहे. बँकेच्या किरकोळ शुल्क उत्पन्नात वाढ आणि थर्ड पार्टी शुल्कातील मजबूत वसुली यामुळे येस बँकेची कामगिरी किंचित सुधारली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये येस बँकेचा गाईडन्स 5,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक असणे अपेक्षित आहे. या वसुलीमधून येस बँकेकडे अतिरिक्त बफर कॅश तयार होईल त्यामुळे बँकेचा ताळेबंद आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.
तज्ञांच्या मते, मध्यम कालावधीत येस बँकेचा मार्जिन 80-100 अंकांनी सुधारण्याची अपेक्षा आहे. येस बँक आपल्या RIDF पोर्टफोलिओमध्ये घट करून उच्च उत्पन्न देणाऱ्या योजनाची अंमलबजावणी करणार आहे. आर्थिक वाढ 2025-26 मध्ये येस बँकेच्या मालमत्तेवर सरासरी 0.54 टक्के परतावा अपेक्षित आहे. तसेच येस बँकेच्या इक्विटीवरील परतावा प्रमाण 5.13 टक्के असणे अपेक्षित आहे. तज्ञांचा विश्वास आहे की येस बँकेचे P/BV प्रमाण मध्यम कालावधीत सध्याचा 1.7 दरापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.