
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. यूएस फेडच्या व्याज दर कपातीच्या बातमीमुळे भारतीय शेअर बाजारात तेजी निर्माण झाली होती. दरम्यान सेन्सेक्स इंडेक्स शुक्रवारी 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 81,867.55 अंकावर पोहचला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 25,010.90 अंकावर क्लोज झाला होता.
यामुळे टाटा मोटर्स, येस बँक लिमिटेड आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारखे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. तज्ञांच्या मते, या शेअर्समध्ये पुढील काळात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळू शकते.
येस बँक :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 32.50 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 24.50 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 2.89 टक्के घसरणीसह 25.52 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक वेट अँड वॉच करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकला 889 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. जर या शेअरने आपली प्रतिकार पातळी तोडली तर शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळू शकते. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 1.71 टक्के घसरणीसह 847.75 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
टाटा मोटर्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 32.50 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या स्टॉकने मजबूत EPS आणि खरेदीदारांची मागणी तसेच व्यापक बाजाराच्या तुलनेत किमतीत मजबूत सुधारणा दर्शविली आहे. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 4.35 टक्के घसरणीसह 1,095 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.