Yes Bank Share Price | येस बँक शेअरसाठी तज्ज्ञांकडून ‘BUY’ रेटिंग, मोठ्या टार्गेट प्राईसचे संकेत

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी 24.40 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक किंचित वाढीसह 24.65 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मते या बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. ( येस बँक अंश )

खरेतर शेअर बाजारात होणारी घसरण ही गुंतवणूकीची संधीच असते. अशा काळात अनेक शेअर्स स्वस्त किमतीवर खरेदी करता येतात. आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 5.10 टक्के घसरणीसह 22.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

येस बँकेच्या शेअरची मूळ ट्रेडिंग रेंज 15 रुपये ते 25 रुपये दरम्यान होती. तज्ञांच्या मते, आता ही ट्रेडिंग रेंज 25 रुपये ते 32 रुपये किमतीवर पोहचली आहे. तज्ञांच्या मते, विक्रीच्या दबावातून बाहेर येताच येस बँकेचे शेअर्स 32 रुपये किमतीवर जाऊ शकतात. यासाठी तज्ञांनी गुंतवणूक करताना 21 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ प्रशांत कुमार यांनी एका निवेदनात म्हंटले आहे की, जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेच्या आर्थिक अडचणीच्या काळात मदतीसाठी पुढे आली होती, तेव्हा SBI येस बँकेची प्रमुख गुंतवणूकदार बनली. त्यानंतर येस बँकेने मोठ्या प्रमाणात बुडीत कर्जाची वसुली सुरू केली. मागील 4 वर्षांंत येस बँकेने वार्षिक 5,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त कर्ज वसुली केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 04 June 2024.