
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका आठवड्यात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त ब्रेकआउट पाहायला मिळाले होते. टेक्निकल चार्टवर येस बँक स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. तज्ञांचा मते, येस बँक स्टॉकमध्ये 27 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट तयार झाला आहे. आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँक स्टॉक 5.89 टक्के घसरणीसह 29.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक 27 रुपये किमतीच्या वर टिकला तर, अल्पावधीत हा स्टॉक 38 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. येस बँकेच्या शेअर्समध्ये एसबीआय या सर्वात मोठ्या सरकारी बँकेने गुंतवणूक केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 4.46 टक्क्यांच्या वाढीसह 31.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 90140 कोटी रुपये आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.81 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.10 रुपये होती.
मागील एका आठवड्यात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. दिला आहे. 5 फेब्रुवारी रोजी ज्या लोकांनी येस बँक स्टॉक 23.60 रुपये किमतीवर खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 33 टक्क्यांनी वाढले आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 17.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 84 टक्के वाढला आहे.
येस बँकेच्या शेअर्सने 16.70 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवरून गुंतवणूकदारांना 88 टक्के परतावा कमावून दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने येस बँकेचे 751.66 कोटी शेअर्स होल्ड केले आहेत. मागील पाच दिवसांत येस बँकेच्या शेअर्समध्ये 33 टक्के म्हणजेच जवळपास 7.77 रुपये वाढ झाली होती. याकाळात स्टेट बँक ऑफ इंडियाने 5787 कोटी रुपये नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.