
Yes Bank Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 0.22 टक्क्यांच्या घसरणीसह 22.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. येस बँक शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. मागील एका वर्षात या बँकेच्या शेअर्सची किंमत 41.38 टक्क्यांनी वाढली आहे. एयूएम कॅपिटल फर्मच्या तज्ञांनी येस बँकेचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.67 टक्के घसरणीसह 21.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( येस बँक अंश )
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. नुकताच कार्लाइल ग्रुपने येस बँकेतील आपले काही शेअर्स विकले आहेत. नुकताच भारत सरकारने एसबीआयला येस बँकेतील भाग भांडवल विकण्याची परवानगी दिली आहे.
SBI कन्सोर्टियमने येस बँकेचे 37.23 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. LIC ने येस बँकेचे 4.34 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँकेने येस बँकेचे 3.43 टक्के भाग भांडवल, आणि ॲक्सिस बँकेने 2.57 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या बँकेचे उर्वरित भाग भांडवल किरकोळ गुंतवणूकदार आणि एफआयआयने धारण केले आहे.
मार्च 2024 तिमाहीत येस बँकेच्या नफ्यात मागील वर्षीच्या तुलनेत जबरदस्त वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर येस बँकेचा नफा 123 टक्क्यांनी वाढला आहे. येस बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात वर्ष-दर-वर्ष आधारावर 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च 2024 तिमाहीत येस बँकेचे प्रोविजन मागील आर्थिक वर्षाच्या आणि मागील आर्थिक वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कमी झाले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीच्या तुलनेत येस बँकेच्या सकल NPA आणि निव्वळ NPA दोन्हीमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.