
Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून ‘येस बँक’ स्टॉकवर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या नजरा खिळल्या आहेत. ‘येस बँक’ एक सकारात्मक बातमी आली आहे, आणि याचा परिणाम बँकेच्या शेअरवर देखील पाहायला मिळत आहे. ही बातमी येताच बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळाली होती. आणि आज गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 1.64 टक्के वाढीसह 15.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. एखाद्या कंपनीबाबत काही सकारात्मक बातमी आली तर त्याचा सकारात्मक परिणाम त्याच्या शेअरवर पाहायला मिळतो. (Yes Bank Limited)
बातमी काय आहे ?
येस बँकेने नुकताच सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, डिसेंबर 2022 तिमाहीच्या तुलनेत मार्च 2023 तिमाहीत बँकेच्या कर्ज आणि ऍडव्हान्समध्ये 5.2 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कर्ज आणि ऍडव्हान्सचा आकडा 2,01,523 कोटी रुपये नोंदवला गेला होता. यापूर्वी डिसेंबर 2022 तिमाहीत कर्ज आणि ऍडव्हान्सचा आकडा 1.91,542 कोटी रुपयेवर पोहचला होता. मार्च 2023 तिमाहीमध्ये वाढीचा दर 14 टक्के आहे, याशिवाय येस बँकेच्या एकूण ठेवींमध्ये 10.6 टक्के YOY वाढ पाहायला मिळाली आहे. मार्च 2023 तिमाहीत एकूण बँकेकडे 2,18,018 कोटी ठेवी होत्या. त्याच वेळी या कालावधीत बँकेचे क्रेडिट ठेव प्रमाण 92.4 टक्के होते. आणि तरलता प्रमाण 126.30 नोंदवली गेली आहे.
2023 या वर्षात येस बँकेचे शेअर्स 30 टक्के कमजोर झाले आहे. येस बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 40 टक्के कमजोर झाले आहे. यावर्षी आतापर्यंत येस बँक या खाजगी बँकेच्या शेअर्सच्या किमतीत 30 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. आज हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत असून, शेअर आणखी वाढू शकतो, असे तज्ञांना वाटते. आज RBI चे पत धोरण ही जाहीर झाले आहे, आणि याचा परिणाम देखील स्टॉकवर पाहायला मिळेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.