
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स जून 2024 तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त दबावात आले आहेत. येस बँक 20 जुलै रोजी आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहे. येस बँकेच्या तिमाही निकालांबाबत तज्ञांचे मत संमिश्र आहे. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 25.70 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मात्र दिवसाअखेर हा स्टॉक 3 टक्क्यांच्या घसरणीसह 24.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकचे शेअर्स 25.76 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( येस बँक अंश )
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, जून तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर येस बँक स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळू शकते. वाढत्या व्यावसायिक खर्चामुळे येस बँकेच्या निधीवर परिणाम होऊ शकतो. सध्या शेअर बाजारातील अनेक तज्ञ येस बँक स्टॉक विकण्याचा सल्ला देत आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटी फर्मच्या अहवालानुसार येस बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात 7.1 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते.
येस बँकेचा निव्वळ नफा 31.9 टक्क्यांच्या वाढीसह 451.90 कोटी रुपये होऊ शकतो, अशी अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे. आनंद राठी फर्मने येस बँकेच्या पोझिशनल शेअरधारकांना येस बँक स्टॉक विकून नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञाच्या मते, येस स्टॉक पुढील काही दिवसात 24 रुपये किमतीवर येऊ शकतो. या बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.81 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.10 रुपये होती. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 78,683.85 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.