16 May 2024 4:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Yes Bank Share Price | येस बँकेच्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा झाली, गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी करावा?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करणाऱ्या येस बँकेच्या शेअर धारकांसाठी खुशखबर आली आहे. येस बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून 2023 या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत येस बँकेच्या निव्वळ नफ्यात 10 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत येस बँकेने 342.52 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीत येस बँकेने 310.63 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 2 टक्क्यांच्या वाढीसह 18.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.83 टक्के घसरणीसह 17.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत येस बँकेने 202.43 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. म्हणजेच तिमाही दर तिमाही आधारावर येस बँकेच्या निव्वळ नफ्यात 69 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत येस बँकेने 7584.34 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेने 5876.01 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. म्हणजेच वार्षिक आधारावर येस बँकेच्या महसूल संकलनात 29 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.

येस बँकेच्या पोझीशनल गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक बातमी अशी की, वाढीव तरतूद असूनही येस बँकेने सलग दुसऱ्या वर्षी नफा कमावण्याचे सातत्य कायम राखले आहे. मागील एका महिन्यात येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10.56 टक्के परतावा कमावून दिला आहे. येस बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 24.75 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 13.57 रुपये होती. मागील सहा महिन्यात येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2.20 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price today on 24 July 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x