
Yes Bank Share Price | मंगळवार, २४ डिसेंबर २०२४ रोजी येस बँक शेअर घसरणीसह बंद झाला होता. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट विश्लेषकांनी येस बँक शेअरबाबत गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला दिला आहे. अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्म आणि स्टॉक मार्केट तज्ज्ञ ध्वनी यांनी ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर महत्वाचे संकेत दिले आहेत. (येस बँक कंपनी अंश)
येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला
ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञ ध्वनी म्हणाले की, ‘येस बँक शेअरमधून गुंतवणूकदारांनी बाहेर पडावे आणि इतर चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी.
अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्मचा सल्ला
ब्रोकरेज फर्म अरिहंत कॅपिटलने येस बँक शेअरसाठी ‘SELL’ कॉल दिला आहे. ब्रोकरेज फर्म अरिहंत कॅपिटलने येस बँक लिमिटेड शेअर 15 ते13 रुपयांपर्यंत घसरू शकतो असे संकेत दिले आहेत. येस बँक शेअर सध्या 19.80 रुपयांवर ट्रेड करत असून तो 15 ते13 रुपयेपर्यंत घसरू शकतो असं अरिहंत कॅपिटल फर्मने म्हटलं आहे.
येस बँक चार्टवरील संकेत
येस बँक लिमिटेड शेअरच्या साप्ताहिक चार्टवर लोअर टॉप लोअर बॉटम फॉर्मेशन तयार होत असल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे. तसेच, येस बँक लिमिटेड शेअरचा मोमेंटम इंडिकेटर आरएसआय सुद्धा नकारात्मक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येस बँक लिमिटेड शेअरमधील घसरणीचा ट्रेंड कायम राहील असं अरिहंत कॅपिटल फर्मने म्हटले आहे.
येस बँक शेअरने 59 टक्के परतावा दिला
मागील ५ दिवसात येस बँक शेअर 4.86% घसरला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 3.18% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 17.61%% घसरला आहे. मागील १ वर्षात येस बँक शेअर 5.54% घसरला आहे. मागील ५ वर्षात हा शेअर 58.77% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये येस बँक शेअरने गुंतवणूकदारांना 59.98% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 12.63% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.