
Yug Decor Share Price | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे, मोफत बोनस शेअर्स. गुंतवणूकदारांना जेव्हा मोफत बोनस शेअर्स मिळतात, तेव्हा त्यांचा आनंद हा काहीतरी वेगळाच असतो. तुम्ही गुंतवणुक असलेली कंपनी तुम्हाला पैसे न देता मोफत बोनस शेअर्स वाटप करते. आणखी काय हवंय, आयुष्यात? मात्र त्यासाठी तुम्हाला अशा कंपनीत गुंतवणुक करावी लागते, मगच ती कंपनी तुम्हाला बोनस शेअर्ससाठी पात्र मानते. सध्या जर तुम्ही बोनस शेअर्सचा फायदा घेऊ इच्छित असाल तर युग डेकोर लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करा. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 100 शेअरवर 15 शेअर्स या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.82 टक्क्यांच्या वाढीसह 112.13 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी युग डेकोर कंपनीचे शेअर्स 3.68 टक्के घसरणीसह 108.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
युग डेकोर बोनस तपशील :
शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले आहे की, युग डेकोर कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 100 शेअर्सवर 15 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांना ही कंपनी मोफत बोनस शेअर्स इश्यू करेल. मात्र युग डेकोर लिमिटेड कंपनीने अद्याप बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख निश्चित केलेली नाही. लवकरच कंपनी रेकॉर्ड तारीख तपशील जाहीर करेल.
युग डेकोर शेअर कामगिरी :
युग डेकोर लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 185 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत युग डेकोर लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 88 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 115 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 36.73 रुपये होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 54.24 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.