 
						Zeal Global Services IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून शेअर बाजारातून बक्कळ कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच तुम्हाला झील ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. शेअर बाजारात एकामागून एक जबरदस्त IPO लाँच होत आहेत.
झील ग्लोबल सर्व्हिसेस ही एक स्मॉल कॅप SME कंपनी आहे. या कंपनीचा आयपीओ शुक्रवार दिनांक 28 जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. झील ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या IPO स्टॉकची किंमत बँड 103 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे.
IPO डिटेल :
झील ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीचा IPO 28 जुलै 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. 1 ऑगस्ट रोजी या IPO ची अंतिम मुदत आहे. तुम्ही या कंपनीच्या IPO मध्ये मंगळवारपर्यंत गुंतवणूक करू शकतात. झील ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 9 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. झील ग्लोबल सर्व्हिसेस ही कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 36.46 कोटी रुपये भांडवल उभारणीचा प्रयत्न करणार आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झील ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीचा IPO 67 पट सबस्क्राइब झाला होता. रिटेल रिझर्व्ह कोटा 39 पट अधिक खरेदी केला गेला होता. तर गैरसंस्थात्मक खरेदीदार रिझर्व्ह कोटा 94 पट अधिक प्रमाणात खरेदी केला गेला आहे. झील ग्लोबल सर्व्हिसेस ही कंपनी 2014 साली स्थापन झाली होती.
झील ग्लोबल सर्व्हिसेस ही कंपनी एअर कार्गो उद्योगातील ग्राहकांना लॉजिस्टिक सोल्यूशन्स सेवा प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीचे मुख्यालय दिल्लीमध्ये स्थित आहे. झील ग्लोबल सर्व्हिसेस कंपनी आपल्या IPO मधून जमा झालेला भांडवल आंशिक कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि उपकंपनीच्या व्यापार वाढीसाठी खर्च करणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		