15 December 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉचा शेअर 1 दिवसात 13% वाढला, मजबूत परतावा देणाऱ्या शेअरवर तज्ञांनी दिली टार्गेट प्राईज

Zen Technologies Share Price

Zen Technologies Share Price| ‘झेन टेक्नॉलॉजी’ या ड्रोन निर्माता कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळाली. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 13 टक्क्यांच्या वाढीसह 324.70 रुपयांवर ट्रेड करत होता. मात्र दिवसा अखेर झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 7.30 टक्क्यांच्या वाढीसह 307.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र आज मंगळवारी दिनांक 9 मे 2023 रोजी ‘झेन टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 310.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मार्च तिमाहीची कामगिरी :
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी येण्याचे प्रमुख कारण म्हणजे, कंपनीने मजबूत तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा खूप चांगले आले आहेत. YOY कंपनीच्या महसुलात 200 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

त्याच वेळी कंपनीच्या नफ्यात 1750 टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या EBITDA मध्ये 700 टक्के वाढ झाली आहे. ब्रोकरेज हाऊस आनंद राठीने या ड्रोन निर्मात्या कंपनीच्या शेअर्सवर 340 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. सोबत त्यांनी 280 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

मागील 6 महिन्यांत ‘झेन टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 53.88 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 83.81 टक्के परतावा कमावून दिला आहे. झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 342.20 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 144.65 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zen Technologies Share Price Today on 09 May 2023.

हॅशटॅग्स

Zen Technologies Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x