
Stock In Focus | 2022 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल हळूहळू बाहेर येत आहेत. काही कंपन्यानी आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या तिमाही निकालांसोबतच कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स, लाभांश असे अनेक लाभ देण्याचे जाहीर केले आहेत. Zim Laboratories Ltd ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिने आपल्या त्रैमासिक निकाल जाहीर केले असून सोबत आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत या कंपनीच्या विक्रीत वार्षिक आधारावर 31.08 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 182.50 टक्क्यांची पाहायला होती आणि, कंपनीने एकूण 5.65 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स ऑफात देण्याची घोषणा केली आहे.
Zim Laboratories Stock Price
Zim Laboratories Ltd कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, ” कंपनी आपल्या10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर, विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे”. तथापि, Zim Laboratories Ltd कंपनीने अद्याप या बोनस शेअर वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख निश्चित केली नाही. बोनस शेअर्स जाहीर केल्यानंतर या वर्षी कंपनीच्या शेअर्सची किमती 163 टक्क्यांनी वधारली आहे.
किंमत 150 टक्क्यांनी वधारली
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर 0.06 टक्क्यांच्या वाढीसह 313.50 रुपयांवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 26.31 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. मागील 6 महिन्यांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, या कंपनीच्या शेअरची किंमत 198.65 रुपयांवर ट्रेड करत होती ज्यात वाढ होऊन स्टॉक 313.50 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या काळात कंपनीचे शेअर्स 57.82 टक्क्यांनी वर गेले आहेत. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 150 टक्क्यांनी वधारली असल्याचे आपण चार्ट पॅटर्नवर पाहू शकतो. कंपनीचे बाजार भांडवल 509.10 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.