
Zomato Share Price | सिंगापूरस्थित एका सरकारी गुंतवणूक कंपनीची उपकंपनी असलेल्या Camas Investments ने बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी भारतातील प्रसिद्ध ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato कंपनीच्या शेअर्समध्ये खूप मोठी गुंतवणूक केली आहे. त्याच दिवशी चीनी ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाची उपकंपनी Alipay Singapore Zomato कंपनीमधील भाग भांडवल विकले आहेत. खुल्या बाजारातील या व्यवहारात चिनी कंपनी अलीबाबाने आपले 1631 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Zomato कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. काल Zomato कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 0.77 टक्क्यांच्या वाढीसह 65.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
सिंगापूरस्थित कंपनीची मोठी गुंतवणुक :
सिंगापूरस्थित कामास इन्व्हेस्टमेंट कंपनीने बूधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटोचे कंपनीचे 9.80 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. या नवीन खरेदीनंतीर कामास इन्व्हेस्टमेंट कंपनीची झोमॅटोमध्ये 4 टक्के गुंतवणूक झाली आहे. कामास इन्व्हेस्टमेंट कंपनीने 62 रुपये प्रति शेअर या किमतीवर 607 कोटी रुपयेचे शेअर्स खरेदी केले आहे. दुसरीकडे Alipay सिंगापूरने झोमॅटोचे 26,28,73,507 शेअर्स 62.06 रुपये किमतीवर विकले होते. 1631 कोटी रुपयांच्या या विक्रीनंतर Alipay सिंगापूर कंपनीचे झोमॅटोमधील भाग भांडवल 3.07 टक्क्यांनी कमी झाले. सप्टेंबर तिमाहीपर्यंत अलीबाबाची उपकंपनीची Alipay सिंगापूर कडे Zomato कंपनीचे 13 टक्के भाग भांडवल होते.
Zomato चा बिझनेस :
Uber टेक्नॉलॉजी कंपनीने आपले Zomato मधील 392 दशलक्ष डॉलर्स किमतीचे शेअर्स ब्लॉक डीलद्वारे विकले. उबरने या ब्लॉक डीलमध्ये झोमॅटोचे 7.8 टक्के शेअर्स विकले. ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato कंपनीला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 250.80 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मागील आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत झोमॅटो कंपनीच निव्वळ तोटा 434 कोटी रुपये होता. नुकताच झोमॅटो कंपनीने ब्लिंकिट ही स्टार्टअप कंपनी खरेदी केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.