15 December 2024 2:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफ जबरदस्त परतावा देणारा गुंतवणूक पर्याय, तुम्हालाही मिळेल मल्टिबॅगेर परतावं

Gold ETF investment

Gold ETF Investment | भारतातील गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड बाजार दहा वर्षांपूर्वी खुला झाला होता. जशी सोन्याची किंमत गगनाला भिडले आहे तशीच आता गुंतवणूक पर्याय म्हणून गोल्ड ईटीएफची लोकप्रियताही गगनाला भिडली आहे. भारतीय लोकांमध्ये आणि सर्वसाधारणपणे गुंतवणूकदारांमध्ये सोन्याला अधिक पसंती दर्शवली जाते, तसेच गेल्या दोन वर्षांतील जागतिक घटनांमुळे जगभरातील अनिश्चिततेमुळे सोन्यातील गुंतवणूक त्यामानाने सुरक्षित मानली जाते. लोक सोन्याला इक्विटी मार्केट गुंतवणुकीपेक्षा जास्त सुरक्षित मानतात. अशा परिस्थितीत कोणत्याही अनिश्चिततेमुळे लोक सोन्याकडे वळतात. येथे आम्ही तुम्हाला अशाच एका गोल्ड ईटीएफ योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

तुम्ही गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक का करावी?
ज्या गुंतवणूकदारांना खेळते पैसे हातात हवे असतात आणि कमी वेळेत सुरक्षित परतावा हवा आहे त्यांच्यासाठी गोल्ड ईटीएफ हा एक गुंतवणुकीचा चांगला पर्याय असू शकतो. हा पर्याय त्या गुंतवणूकदारांसाठी चांगला आहे जे विद्यमान आर्थिक देयांमुळे दीर्घ कालावधीसाठी ज्यांना गुंतवणूक ठेवणे शक्य नाही. गोल्ड ईटीएफ एक्सचेंजवर सोने कधीही विकले जाऊ शकतात. गेल्या काही वर्षांत, अनेक गोल्ड ईटीएफने जबरदस्त परतावा दिला आहे. महागाईवर मात करण्यासाठी गोड ETF मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.

इन्वेस्को इंडिया गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड :
ही एक कमोडिटी म्युच्युअल फंड योजना आहे. विशेषत: या योजनेत गोल्ड कमोडिटी मध्ये गुंतवणूक केली जाते. 12 मार्च 2010 रोजी इन्वेस्को म्युच्युअल फंड हाऊसने गोल्ड एक्सचेंज ट्रेडिंग फंड लॉन्च केले होते. हा एक ओपन एंडेड फंड आहे. या फंडाची एकूण मालमत्ता 90.76 कोटी रुपये आहे आणि 22 एप्रिल 2022 रोजी घोषित केलेली नवीनतम निव्वळ मालमत्ता मूल्य 4743.22 कोटी रुपये आहे. फंडाचा खर्च गुणोत्तर 0.55 टक्के आहे.

गोल्ड फंड योजनेतील धोका :
हा फंड मध्यम-उच्च जोखमीचा फंड मानला जातो. सोन्याची देशांतर्गत किंमत हा या फंडाचा बेंचमार्क आहे. या फंडासाठी आवश्यक किमान गुंतवणूक रक्कम 5000 रुपये आहे. या फंडावर कोणताही एक्झिट पेलोड नाही. म्हणजेच, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही या फंडातून पैसे काढू शकता, तुमच्याकडून कोणतेही शुल्क किंवा चार्ज आकारले जाणार नाही.

गुंतवणुकीवर परतावा :

या फंडात गुंतवलेल्या रकमेवर मिळणारा संपूर्ण परतावा पाहिल्यास :
* 1 वर्षात – 10.35 टक्के,
* 2 वर्षात – 9.75 टक्के,
* 3 वर्षात – 64.28 टक्के,
* 5 वर्षात – 71.19 टक्के,
* 10 वर्षात – 67.97 टक्के
जर आपण ह्या फंडाच्या सुरुवातीला गुंतवणूक केली असती तर आता आपल्याला तब्बल 181.36 टक्के परतावा मिळाला असता.

एकवेळच्या एकरकमी गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
* 1 वर्षात – 10.35 टक्के,
* 2 वर्षात – 4.76 टक्के,
* 3 वर्षात – 17.98 टक्के,
* 5 वर्षात – 11.34 टक्के,
* 10 वर्षात – 5.32 टक्के
सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत मिळालेला सरासरी वार्षिक परतावा – 8.91 टक्के वार्षिक

गोल्ड ईटीएफ म्हणजे काय?
सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गोल्ड ईटीएफ हा एक चांगला पर्याय मानला जातो. गोल्ड ईटीएफ हा प्रत्यक्षात एक कमोडिटी म्युच्युअल फंड आहे. गोल्ड ईटीएफ देखील सोन्याच्या किमतीनुसार वर-खाली येत असता. गोल्ड ईटीएफ गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत प्रचंड मोठा परतावा मिळतो. चांगली गोष्ट म्हणजे गोल्ड ईटीएफ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतात. तुम्हाला त्यातल्या सोन्याच्या शुद्धतेबद्दल काळजी करण्याची गरज नाही. प्रत्यक्ष सोन्याच्या तुलनेत गोल्ड ईटीएफ लवकर आणि चांगल्या दराने विकले जातात.

गोल्ड ईटीएफ एक फायदेशीर गुंतवणूक :
गोल्ड ईटीएफ या योजनेने आता पर्यंत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. हा एक ओपन एंडेड कमोडिटी म्युच्यअल फंड आहे. या फंडाची मालमत्ता 90.76 कोटी रुपये आहे आणि 22 एप्रिल 2022 रोजी घोषित केलेली नवीनतम निव्वळ मालमत्ता मूल्य 4743.22 कोटी आहे. फंडाचा खर्च गुणोत्तर 0.55 टक्के आहे, जो त्याच्या श्रेणीच्या सरासरी खर्च गुणोत्तरापेक्षा जास्त आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gold ETF Investment opportunity with high returns and benefits on 3 August 2022.

हॅशटॅग्स

#Gold ETF Investment(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x