 
						Gold Investment | दिवाळीचा सण उद्यावर आला आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीला लोक मनसोक्त खरेदी करतात. या सणात सोने खरेदी करणेही चांगले मानले जाते. या सणासुदीच्या काळात दागिन्यांच्या दुकानांमध्ये तुम्ही जबरदस्त गर्दी पाहू शकता. दिवाळीमध्ये लोक सोने चांदीचे दागिने खरेदी करतात आणि लक्ष्मी पूजनच्या दिवशी त्यांची पूजा करतात. पण सोन्याची किंमत जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे परवडत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, तुम्ही फक्त 1 रुपयातही सोने खरेदी करू शकता? या दिवाळीत 1 रुपयात सोने करा. कसे करायचे ते आम्ही तुम्हाला सांगू
डिजिटल गोल्ड खरेदी :
आज या लेखात आम्ही तुम्हाला डिजिटल गोल्ड माहिती देणार आहोत. तुम्ही वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने सोने खरेदी करून डिजिटल रुपात ठेवू शकता. तुम्ही 1 रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड गुंतवणूकीचा उत्तम पर्याय मानला जातो. आजकाल लाखो लोक डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक करतात, आणि पैसे कमावतात. डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe सारखे मोबाईल वॉलेट प्लॅटफॉर्म सहज वापरू शकता. जर तुमच्याकडे GooglePay, Paytm किंवा PhonePay ॲप असतील तर तुम्ही 1 रुपयेमध्ये 999.9 शुद्ध प्रमाणित डिजिटल गोल्ड विकत घेऊ शकता.
डिजिटल गोल्ड खरेदी करण्याची पद्धत :
* तुमचे मोबाइल वॉलेट अॅप वापरून तुम्ही एक रुपयाचे सोने खरेदी करू शकता.
* मोबाइल वॉलेट अॅपवर डिजिटल गोल्ड आयकॉनवर क्लिक करा किंवा सर्च वर जाऊन गोल्ड पर्याय शोधा.
* यानंतर Manage Your Money मध्ये बाय गोल्डचा पर्याय निवडा.
* तुम्हाला किती सोने खरेदी करायचे आहे ते निवडा.
* खरेदी व्यतिरिक्त, सोने विक्री, तारण आणि भेटवस्तूचा पर्याय देखील उपलब्ध असेल.
* जर तुम्हाला सोने विकायचे असेल तर तुम्हाला सेल पर्यायावर क्लिक करावे लागेल, आणि गिफ्ट करण्यासाठी गिफ्टचा पर्याय निवडावा.
घरपोच डिलिव्हरीही उपलब्ध :
जर तुम्हाला डिजिटल गोल्ड घरबसल्या ऑर्डर करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला होम डिलिव्हरीचा पर्यायही देण्यात आला आहे. पण होम डिलिव्हरीसाठी तुम्हाला एका ठराविक प्रमाणात सोने विकत घ्यावे लागेल. होम डिलिव्हरीसाठी किमान खरेदी मर्यादा अर्धा ग्रॅम डिजिटल सोने निश्चित करण्यात आली आहे. सोन्याच्या शुद्धतेची किंवा सुरक्षिततेची चिंता करण्याची गरज नाही कारण डिजिटल गोल्ड हे शुद्धच असते आणि त्याचे प्रमाणीकरण केलेले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		