
Gold Price Today | जर तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, जागतिक पातळीवरील कमकुवत कलांमध्ये गुरुवारी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. दहा ग्रॅम सोने ५० हजार ५९७ रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. एक किलो चांदीचे दरही कमी झाले असून, आता ते 58,111 रुपये दराने विकले जात आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
सध्या सोन्याचा भाव काय आहे
एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचे दर 402 रुपयांनी घसरून 50,597 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. याआधीच्या व्यापारात मौल्यवान धातू 50,999 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
चांदीचे दर कितीवर
चांदीचे दर 1,244 रुपयांनी कमी होऊन 58,111 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. मागील व्यापारात तो ५६,८६७ रुपये प्रति किलो दराने व्यापार करत होता.
तज्ज्ञ काय म्हणतात
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,६२८.७ डॉलर प्रति औंस आणि चांदी १९.१५ डॉलर प्रति औंसवर होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिसर्च अॅनालिस्ट दिलीप परमार म्हणाले, ‘फेडरल रिझर्व्ह चेअर पॉवेल यांनी असे संकेत दिले की, केंद्रीय बँक छोट्या दरात वाढ लागू करण्यास सुरुवात करेल, ज्यामुळे कॉमेक्स सोन्यात घसरण झाली आहे.
सोन्याचा दर जाणून घेणे खूप सोपे
विशेष म्हणजे हे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल 8955664433 आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही लेटेस्ट रेट चेक करू शकता.
सोन्याची शुद्धता कशी तपासावी
तुम्ही घरी बसून बीआयएस केअर अॅपच्या माध्यमातून सोन्याची शुद्धता तपासू शकता. गोल्ड लायसन्स नंबर, हॉलमार्क किंवा रजिस्ट्रेशन नंबर चुकीचा असेल तर तुम्ही थेट सरकारकडे तक्रार करू शकता. तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणात काय कारवाई झाली, याचीही माहिती मिळेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.