
Gold Price Today | देशात सोन्याचा किरकोळ व्यवसाय सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असतो, पण घाऊक व्यवसाय संध्याकाळी बंद होतो. सोन्या-चांदीच्या बंद दरांबरोबरच देशातील प्रमुख शहरांचे दरही बदलले आहेत.
आज सराफा बाजारात सोन्याचा दर
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी सोन्याचा भाव 60417 रुपये होता. आज सकाळी हा दर ६०२२० रुपये होता. त्यामुळे आज सकाळ-संध्याकाळ सोने १९७ रुपयांनी वधारले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर 60,168 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद झाला होता. त्यामुळे तो मागील व्यवहाराच्या तुलनेत २४९ रुपये प्रति १० ग्रॅमने वधारून बंद झाला. याशिवाय चांदीचा भाव आज 74226 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. चांदीच्या दरात ७ रुपयांनी घसरण झाली आहे.
सोन्याचा दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा किती खाली?
सोनं आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 463 रुपयांनी स्वस्तात विकलं जात आहे. याआधी 13 एप्रिल 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचे दर 60880 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचले होते.
येथे सुद्धा सोन्याच्या दरात घसरण
अमेरिकी फेड रिझर्व्ह या महिन्यात व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सची वाढ करू शकते. या एका बातमीने सोन्याच्या दरवाढीला लगाम घातला आहे. मंगळवारी सकाळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. आज सकाळी वायदा बाजारात देखील सोनं 59,743 रुपये प्रति 10 ग्राम वर ट्रेड करत होतं, जो त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा 1600 रुपयांनी स्वस्त आहे. सोन्याचा उच्चांक 61,371 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.