 
						Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतींबाबत मोठी बातमी आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या दरात आज घसरण झाली आहे. एमसीएक्सवर जाहीर करण्यात आलेल्या दरांमधून ही माहिती मिळाली आहे. एकीकडे मागील काही दिवसांपासून बाजारात सोन्याने 61000 चा टप्पाही ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
सोनं झालं स्वस्त
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.68 टक्क्यांनी म्हणजेच जवळपास 460 रुपयांनी घसरून 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. परिणामी, सराफा बाजारातही सोनं स्वस्त झालं आहे. त्यामुळे ही सोनं खरेदीची मोठी संधी आहे.
चांदीही स्वस्त झाली आहे
चांदीच्या किंमतींबद्दल बोलायचे झाले तर चांदीचा दरही आज स्वस्त झाला आहे. चांदीचा भाव 0.35 टक्क्यांनी घसरून 74310 रुपये प्रति किलो झाला.
सोन्याचे दर कसे तपासायचे?
तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल देऊनच किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचे मेसेज येतील.
तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर तपासून घ्या :
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५५४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४३० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५५४३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४६० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५५४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४३० रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 55430 रुपये, 24 कॅरेट सोने : 60460 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 55400 रुपये, 24 कॅरेट सोने : 60430 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५५४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४३० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५५४३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४६० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 55400 रुपये, 24 कॅरेट सोने : 60430 रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५५४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४३० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५५४३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४६० रुपये
तज्ज्ञांचे मत काय आहे?
या दिवशी दोन्ही मौल्यवान धातू तेजीचा नवा विक्रम रचतील, असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्यांच्या मते, सोने 65,000 रुपयांपर्यंत आणि चांदी 80,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
सोने खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्हीही बाजारात सोनं खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅपचा ही वापर करू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय या अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार करू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		