 
						Gold Price Today | काल वायदा बाजारात सोन्याच्या दरात घसरण दिसल्यानंतर आज तो ग्रीन खुणासह उघडला आहे. मात्र, गोल्ड फ्युचर्स अद्याप मर्यादित श्रेणीत व्यवहार करीत आहे. मात्र कालच्या व्यवहारानंतर सोन्याच्या किंमतीना पुन्हा ५५ हजारांचा टप्पा ओलांडण्यात यश आले आहे. मागील सत्रात सोने ५४,८०० च्या पातळीवर आले होते. त्याचबरोबर चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज एमसीएक्स सिल्वरमध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण आजही कायम आहे.
वायदा बाजारात सोन्याची किंमत
वायदा बाजारात आज सोन्याचा व्यवहार हिरव्या रंगात ट्रेड करत आहेत, पण तरीही हा मौल्यवान धातू दबावाखाली व्यवहार करत आहे. सुरुवातीला सोन्याचा भाव 51 रुपयांनी किंवा 0.09 टक्क्यांनी वाढून 55,352 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. मागील सत्रात तो 55,301 रुपयांवर बंद झाला होता. चांदीचा भाव 321 रुपयांनी किंवा 0.52 टक्क्यांनी घसरून 61,663 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. कालच्या व्यवहारात तो ६१,९८४ रुपयांवर बंद झाला होता.
सराफा बाजारात आज सोन्याचा भाव घसरला
सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ८० रुपयांनी घसरून 55,025 रुपयांवर पोहोचला आहे. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 55,105 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भावही ३९० रुपयांनी घसरून ६१,९५५ रुपये प्रति किलो झाला. बुधवारी सोने-चांदीच्या घसरणीच्या तुलनेत आता दोन्ही धातूंनी स्पॉट मार्केटमध्ये सुधारणा केली आहे. बुधवारी सोने 615 रुपयांनी तर चांदी 2,285 रुपयांनी घसरली होती.
14 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत?
आता आयबीजेए (इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएटेड लिमिटेड) वर सोन्या-चांदीच्या वेगवेगळ्या कॅरेटमध्ये सोन्याचे दर काय सुरू आहेत ते पाहूया.
* Fine Gold (999)- 5,529
* 22 कॅरेट – 5,396
* 20 कॅरेट- 4,920
* 18 कॅरेट- 4,478
* 14 कॅरेट- 3,566
* चांदी (999)- 61,793
महाराष्ट्रातील विविध शहरांमधील आजही सोन्याचे नवे दर
* औरंगाबाद – २२ टक्के सोने : ५१४०० रुपये, २४ टक्के सोने : ५६०७० रुपये
* भिवंडी – २२ टक्के सोने : ५१४३० रुपये, २४ टक्के सोने : ५६१०० रुपये
* कोल्हापूर – २२ ग्रॅम सोने : ५१४०० रुपये, २४ टक्के सोने : ५६०७० रुपये
* लातूर – 22 ग्रॅम सोने : 51430 रुपये, 24 टक्के सोने : 56100 रुपये
* मुंबई – 22 टक्के सोने : 51400 रुपये, 24 टक्के सोने : 56070 रुपये
* नागपूर – २२ टक्के सोने : ५१४०० रुपये, २४ टक्के सोने : ५६०७० रुपये
* नाशिक – २२ टक्के सोने : ५१४३० रुपये, २४ टक्के सोने : ५६१०० रुपये
* पुणे – 22 ग्रॅम सोने : 51400 रुपये, 24 टक्के सोने : 56070 रुपये
* सोलापूर – 22 ग्रॅम सोने : 51400 रुपये, 24 टक्के सोने : 56070 रुपये
* वसई-विरार – २२ टक्के सोने : ५१४३० रुपये, २४ टक्के सोने : ५६१०० रुपये
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		