 
						Gold Price Today | या आठवड्यात सोनं खरेदीचा विचार करत असाल तर मोठी फायद्याची बातमी समोर आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोमवारी सोन्याचा भाव 485 रुपये म्हणजेच 0.86 टक्क्यांनी घसरून 55,743 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. कमॉडिटी एक्सचेंज तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महागाई आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दरवाढ होण्याची भीती, डॉलर निर्देशांक मजबूत झाल्याने व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवहारांचा आकार कमी केला, ज्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली.
शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण का झाली?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 56204 रुपयांवर खुला झाला आहे. तर, मागील व्यवहाराच्या दिवशी तो 56428 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम २२४ रुपयांनी घसरला आहे. मात्र, त्यानंतरही सोने आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून सुमारे 2678 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता.
ज्वेलरी बाजाराच्या तज्ज्ञांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचा भाव एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. सोन्याच्या दरात झालेली आजची घसरण ही अमेरिकेतील आर्थिक आकडेवारीचा परिणाम आहे. पीपीआय डेटा जानेवारी (एमओएम) मध्ये वाढलेला एक प्रमुख महागाई मेट्रिक आहे. यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी फेड अपेक्षेपेक्षा अधिक दरवाढ करू शकते, अशी चिंता बाजारात व्यक्त केली जात आहे. या आकडेवारीमुळे डॉलर निर्देशांकही १०४ च्या पातळीवर गेला आणि डॉलरच्या उच्च पातळीमुळे सोन्याची खरेदी अधिक महाग झाली.
डॉलरची उच्च पातळी आणि वाढते व्याजदर यामुळे सोन्याच्या खरेदीकडे आकर्षण कमी होते. देशांतर्गत पातळीवरही एमसीएक्सवर सोने एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे. आजच्या व्यवहारात तो 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीच्या खाली घसरला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		