 
						Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कमी झालेले दर ऐकून तुम्हीही खूश होऊ शकता. आज शुक्रवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र, चांदीच्या दरात आज संमिश्र कल दिसून आला आहे.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. येत्या काळात सोने ६५ हजारांपर्यंत पोहोचू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यात सोने ५५ हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते. पण त्यानंतर सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहेत. सोन्याच्या तेजीबरोबरच चांदीतही वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. काही महिन्यांत चांदी ८० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.
सराफा बाजारात मोठी घसरण
इंडिया बुलियन्स असोसिएशनकडून सराफा बाजाराचे दर दररोज जाहीर केले जातात. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 350 रुपयांनी घसरून 60169 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा भावही ५०० रुपयांनी घसरून ७३,९३४ रुपये प्रति किलो झाला. आज मुंबई-पुणे सारख्या शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
सोने आणि चांदीच्या दरात एमसीएक्सवर कल?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून आला. शुक्रवारी दुपारी सोने 61 रुपयांनी घसरून 59840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 49 रुपयांनी घसरून 75329 रुपये प्रति किलो झाली. याआधी गुरुवारी सोने 59901 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 75280 रुपयांवर बंद झाली होती.
तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर :
* औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : ५५७५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०८२० रुपये
* भिवंडी, 22 कॅरेट सोने : 55780 रुपये, 24 कॅरेट सोने : 60850 रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : ५५७५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०८२० रुपये
* लातूर, २२ कॅरेट सोने : ५५७८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०८५० रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 55750 रुपये, 24 कॅरेट सोने : 60820 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : ५५७५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०८२० रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : ५५७८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०८५० रुपये
* पुणे, २२ कॅरेट सोने : ५५७५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०८२० रुपये
* सोलापूर, २२ कॅरेट सोने : ५५७५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०८२० रुपये
* वसई-विरार, २२ कॅरेट सोने : ५५७८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०८५० रुपये
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		