 
						Gold Price Today | सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 38,460 रुपयांवर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील सत्रात सोन्याचा भाव 58,850 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद झाला होता. मात्र चांदीचा भाव 350 रुपयांनी वाढून 70,100 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनी सांगितले की, देशातील सराफा बाजारात सोन्याचा स्पॉट भाव 110 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरून 58,740 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
विदेशी बाजारातही सोन्यात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,962 डॉलर प्रति औंस तर चांदीचा भाव 23.14 डॉलर प्रति औंस झाला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, कॉमेक्सवर सोन्याचा भाव 0.60 टक्क्यांनी घसरून 1,962 डॉलर प्रति औंस झाला आहे. कालही परदेशी बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली होती.
कमी मागणीमुळे सोन्याचा भाव वायदा बाजारातही घसरला
कमोडिटी गुंतवणूकदारांकडून कमी मागणी झाल्याने वायदा व्यवहारातही सोन्याचा भाव २५६ रुपयांनी घसरून ५८,७८६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव 256 रुपयांनी किंवा 0.43 टक्क्यांनी घसरून 58,786 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. विश्लेषकांनी सोन्याच्या दरात घसरण होण्याचे कारण व्यापाऱ्यांनी आपले पोझिशन्स घटवल्याचं कारण सांगितलं आहे.
तुमच्या शहरातील आजचे २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
1. औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
2. भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५४७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७०० रुपये
3. कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
4. लातूर – २२ कॅरेट सोने : ५४७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७०० रुपये
5. मुंबई – 22 कॅरेट सोने : 54700 रुपये, 24 कॅरेट सोने : 59670 रुपये
6. नागपूर – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
7. नाशिक – २२ कॅरेट सोने : ५४७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७०० रुपये
8. पुणे – 22 टक्के सोने : 54700 रुपये, 24 कॅरेट सोने : 59670 रुपये
9. सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
10. वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५४७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७०० रुपये
कालही सोन्याच्या दरात घसरण झाली
आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर काल राष्ट्रीय राजधानीत सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 38,460 रुपयांवर पोहोचला होता. तर दुसरीकडे चांदीचा भाव सुद्धा 380 रुपये घसरून 69,700 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		