
Gold Rate Today | भारतीय बाजारात आज सोने-चांदी स्वस्त झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर सोने आणि चांदी च्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव 58500 च्या खाली घसरला आहे. याशिवाय चांदीही 71,400 च्या जवळपास व्यवहार करत आहे. चला तर मग जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे.
आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 58724 रुपयांवर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 58865 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 141 रुपयांनी घसरला आहे.
सध्या सोन्याचा भाव 2,861 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. आज चांदीचा भाव 70,793 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 70,900 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज १०७ रुपयांची घसरण झाली आहे. चांदी 5671 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
एमसीएक्सवर सोन्याचा दर
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. 5 ऑक्टोबर 2023 रोजी सोन्याचा वायदा व्यापार 76.00 रुपयांच्या घसरणीसह 58,550.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर 5 डिसेंबर 2023 रोजी चांदीचा वायदा व्यापार 597.00 रुपयांनी घसरून 71,337.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
आज महाराष्ट्रात सोन्याचे दर
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 54500, 24 कॅरेट सोने : 59450 रुपये
* नागपूर, 22 टक्के सोने : 54500, 24 कॅरेट सोने : 59450 रुपये
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.